पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला. ...
पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. येथे बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा शुक्रवारी निमोनियाने मृत्यू झाला. नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची तुकडी पांढरकवडा बंदोबस्तासाठी गुरूवारी यवतमाळला आली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील नियोजित महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या दिल्ली स्थित कार्यालयातील अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ...
वीज वितरण कंपनीने मागेल त्याला वीज जोडणी देण्याचा दावा केला होता. तरी प्रत्यक्षात १० हजारांवर कृषीपंपाच्या वीज जोडणीचे अर्ज जिल्ह्यात प्रलंबित आहे. चार वर्षांपासून हे शेतकरी वीज जोडणी मागत आहेत. मात्र त्यांना अजूनही विजेचे नवीन कनेक्शन मिळाले नाही. ...
जिल्हा परिषदेत बुधवारी चक्क वकिलांवरच प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पॅनल निवडीसाठी बुधवारी वकिलांची निवड समितीने मुलाखत घेतली. त्यात वकिलांना विविध प्रश्नांनी भांडावून सोडले. ...