३० मार्च रोजी टिपेश्वर अभयारण्याला आग लागून १५० हेक्टर भागातील लाखो रूपयांची वनसंपदा व वन्यप्राणी तसेच पशू जळून खाक झाले. तोच पुन्हा सोमवारी या अभयारण्यात दोन ठिकाणी आग लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती व पशुपक्षी आगीच्या भक्षस्थानी पडले. ...
मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सध्या कापूस सहा हजार २०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रूपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाडीचा दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे. ...
कार्यालय सुटल्यानंतर मुलाच्या लग्नपत्रिका वाटायला निघालेल्या वडिलाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास साखरा (ता.घाटंजी) गावाजवळ घडली. सुरेश किसन हजारे (रा.जरंग) असे मृताचे नाव आहे. ...
चंद्रपूरचा नवा खासदार दारूवाला हवा की दूधवाला, असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. विरोधक काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्यापुढे अडचणी वाढवित आहेत. ...
येथील प्रभाग दोन आणि चारमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. लोकांनी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडूनही दुर्लक्ष करण्यात आले. मंगळवारी या भागातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आपला राग व्यक्त केला. ...
स्थानिक पातळीवर पाण्याची समस्या भीषण असून दिग्रसमध्ये दहा दिवसाआड नळ येतात. कचरा आणि नाल्यांची समस्या कायमच आहे, अशी व्यथा दिग्रस येथील पूजा टोकसिया यांनी बस प्रवासादरम्यान व्यक्त केली. त्याचवेळी पुसद तालुक्यातील वरूड येथील दीपक इनामे म्हणाले, आमच्या ...
कर्मकांड करण्यापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन लातूर येथील जीवनदादा पाटील यांनी केले. अनेक दृष्टांत देऊन त्यांनी संयमित जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले. ...
सुपीक शेती आणि कसदार शिक्षण देणाऱ्या संस्था हे जिल्ह्याचे वैभव असले तरी या दोन्ही क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या तरुणांना सामावून घेणाºया उद्योगांची जिल्ह्यात प्रचंड वाणवा आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील बेरोजगारांचा आकडा वाढत गेला. मात्र २०१९ च्या लो ...
तब्बल आठ कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना गतवर्षी पूर्णत्वास गेलेली असताना राळेगावकरांना आत्ताच १५ दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पेटण्याचे संकेत असून पाण्याअभावी एप्रिल व मे महिन्यात नागरिकांवर शहर सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले शोधनिबंध सादर केले. या परिषदेत सुमारे ४५ राष्ट्रांमधून संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. ...