जिल्हा परिषदेच्या तीन सभापतींविरूद्ध शिवसेना-भाजपने संयुक्तपणे अविश्वास दर्शवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार आता येत्या ३ मे रोजी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकर भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन १७ एप्रिल रोजी येथे करण्यात आले आहे. भारतीय जैन संघटना यवतमाळ शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. ...
शहरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. एकही चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. शनिवारी रात्री चोरट्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाला लक्ष्य केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
निळे ध्वज, निळ्या पताका, निळाची उधळण, जय भीमचा जयघोष आणि स्वागत कमानी यामुळे रविवारी यवतमाळचा संपूर्ण परिसर भीममय झाला होता. निमित्त होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीचे. जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली ...
तालुक्यातील मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी केली जात आहे. याकडे मात्र वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ...
‘ज्ञानसूर्य तू इस जगत का भीमराव महान’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती विशद करणारी यासारखी भीमगीते रविवारी सादर करण्यात आली. समतापर्वाच्या वतीने आयोजित निळी पहाट या संगीत मैफलीत ही भीमगीते सादर झाली. स्थानिक गायकांनी गायिलेल्या या भीमगीतांमुळे यवतमाळकर ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरूद्ध कामगारांनी तप्त उन्हात उपोषण सुरू केले आहे. ४२ डिग्री तापमानाने शरीराची काहिली होत असताना कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. ...