यवतमाळमध्ये आढळला दुर्मीळ ‘करडा तुतवार’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:38 AM2019-05-10T05:38:33+5:302019-05-10T05:38:49+5:30

भारतात अत्यंत दुर्मीळ असणारा, उत्तर रशिया व सैबेरियातच आढळणारा करडा तुतवार हा देखणा पक्षी यवतमाळात आढळला. येथून जवळच असलेल्या जामवाडी तलावावर त्याची नोंद घेण्यात आली.

 The rare 'karada Tutwar' found in Yavatmal | यवतमाळमध्ये आढळला दुर्मीळ ‘करडा तुतवार’

यवतमाळमध्ये आढळला दुर्मीळ ‘करडा तुतवार’

Next

यवतमाळ : भारतात अत्यंत दुर्मीळ असणारा, उत्तर रशिया व सैबेरियातच आढळणारा करडा तुतवार हा देखणा पक्षी यवतमाळात आढळला. येथून जवळच असलेल्या जामवाडी तलावावर त्याची नोंद घेण्यात आली.
प्रामुख्याने सागर किनारे, भरती-ओहोटीच्या काळातील खाड्या, खाजणे आणि खाऱ्या पाण्याची तळी अशा ठिकाणांवर याचा वावर असतो. हा पक्षी उत्तर रशिया व सैबेरियातून भारतीय उपखंडात शीतऋतूदरम्यान स्थलांतर करतो. परतीच्या प्रवासादरम्यान यवतमाळजवळील जामवाडी तलावावर तो थांबला. अमोलकचंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक दाभेरे यांनी त्याची नोंद घेतली. मुंबई, केरळ, गुजरातच्या समुद्री भागात हे पक्षी आॅक्टोबर ते एप्रिलदरम्यान आढळतात.

Web Title:  The rare 'karada Tutwar' found in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.