दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा जिल्हा आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला. ...
नगरपरिषद, नगरपंचायतीत वाल्मिकी व सुदर्शन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजातील स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची मजूरी आणि सुविधा व सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. या समाजावर अन्याय केला जात आहे. ...
एकाच फांदीवर फुलही उगवते आणि काटेही उगवतात. फुलाचे आयुष्य अल्प असले तरी ते इतरांना सुगंधीत करून जाते. काट्याचे जीवन दीर्घकाळ असले तरी ते सर्वांसाठी दु:खदायक ठरते. ...
मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने कामठी रोड, नागपूर येथील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांचे कीर्तन होणार आहे. ...
येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ...
आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. ...
ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्य करणाऱ्या संस्कार भारतीच्यावतीने शहरातील साहित्य, चित्रकला, क्रीडा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठांचे गुरुपौर्णिमेनिमित्त पूजन करण्यात आले. ...