येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
नगरपरिषदेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. बहुमताच्या जोरावर कुठलेही निर्णय घेतले जात आहे. डिसेंबर २०१६ मध्ये अस्तित्वात आलेल्या नगरपरिषदेला घनकचरा सफाईचा प्रश्न सोडविता आला नाही. ...
शहरातील मुलकी परिसरात राहणाऱ्या पदवीधर युवकाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याने दारूसाठा लपविताना स्वत:चे तांत्रिक कौशल्य लावले. यामुळे जांब वाघाडी येथे सुरू असलेला दारू गुत्ता अनेक वर्षानंतर उजेडात आला. ...
सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे. ...
तालुक्यात ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठे करण्यात आले. ढाणकी रस्त्यालगतच्या वेअर हाऊसजवळ हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा निर्माण झाला. या साठ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी येथील तहसीलसमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. ...
येथील आझाद मैदानातील ऐतिहासिक विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात सापडला. या विषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच गुरुदेव युवा संघाने पुढाकार घेत विजयस्तंभाची स्वच्छता केली. या स्तंभाला सजविण्यात आले. तिरंगा ध्वज व खाऊ वाटप करण्यात आले. ...
लोकसभा निवडणूक होताच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २० लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे. ...