लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्य ...
खरीप हंगाम तोंडावर आला. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकरी भरडले जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अडचण आणू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी आमदारांनी दिली. कर्ज वाटपासंदर्भात त्यांनी खास बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्न ...
शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या एका जणाला सुट्टी देण्यात आली आहे. या व्यक्तिचा सुरवातीचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला होता. मात्र उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाली आहे. ...
लॉकडाऊनमुळे आगारात अडकून पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाश्यांना दिलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत प्रवाश्यांचे हित जपले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाखो सामान्य प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ...
राळेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सकाळी अनेकांना चावा घेतला. या घटनेची माहिती गावात पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...
यवतमाळ जिल्हा प्रशासन येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी उपाययोजना करत आहे. याउलट स्थिती यवतमाळ जिल्ह्यातील बाहेर राज्यात अडकलेल्या मजुरांची आहे. घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील मजूर आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये अडकू ...
लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे. ...
चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यवतमाळ व स्थानिक प्रशासन यांच्यात मंगळवारी बैठक झाली. सुरुवातीला चेंबर ऑफ कॉमर्सने यवतमाळात कोरोना नियंत्रणात आणल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. दरम्यान, लॉकडाऊन-४ मध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असे ...