नागरिकांच्या त्रासाची पालिकेत कोणालाच जाणीव नाही. त्याचे काम हे सोयीनेच केले जाते. अजून पर्यंत मुरूमाचे कंत्राट कोणाला देणार हेच निश्चित झाले नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर व रस्त्यावरचा चिखल सुकल्यावरच तेथे मुरूम टाकला जाणार आहे. मुरूम टाकतांनाही को ...
या खाणीच्या वाढीव क्षेत्रात सध्या कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या खाणीत मोठमोठाले स्फोट घडविले जात आहेत. स्फोटादरम्यान खाणीतील मोठमोठाले दगड आजुबाजूच्या शेतांमध्ये जाऊन आदळत आहे. सध्या खरिप हंगामाची कामे श ...
राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यात आतापर्यंत तीन टप्पे पार पडले असून त्यातून हजारो शिक्षक गृहजिल्ह्यात परतले आहेत. आता चौथ्या टप्प्याची प्रक्रिया जानेवारीत सुरू झाली. त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याव ...
जिल्ह्यात मक्याचे फार क्षेत्र नाही. ज्वारीची खरेदी केंद्रे ११ मे रोजी सुरू करून १५ जूनपर्यंत ही खरेदी संपविण्याचे आदेश होते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, वणी आणि झरी या सात खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. संबंधित ...
यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा येथून आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. २४ तासात दीडशे नमुने तपासणीची क्षमता या लॅबमध्ये आहे. सहा तंत्रज्ञ व प्राध्यापकांच्या अहोरात्र परिश्रमामुळे हे शक्य होत आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून व्हायरॉलॉजी लॅब चाल ...
सभेत बांधकाम विभागाच्या सात कोटी १७ लाखांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. सर्व सदस्यांच्या मतदारसंघात समान निधी देणार असल्याचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी सांगितले. ...
मे महिन्याचे मिळून ७५ टक्के वेतन कमी देण्यात आले. त्यासाठी इतर राज्याप्रमाणे शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. महामंडळाचे दररोज २३ कोटी रुपये उत्पन्न बुडत आहे. ...
नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने लॉकडाऊन होता. आता काही प्रमाणात सूट मिळाली. वीज वितरणने मीटर रिडींग न घेताच ग्राहकांना तीन महिन्यांचे सरासरी बिल दिले. हे बिल बघून ग्राहकांचे डोळे विस्फारत आहे. ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे व ...
यवतमाळच्या बाजारपेठेतून शेतीमध्ये कीटकनाशक फवारणीसाठी वापरले जाणारे स्प्रे पंप अचानक गायब झाले आहे. दुसरे पंप उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. ...