परीक्षा निर्णयाविरोधात फार्मसी कृती समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:10+5:30

राज्य सरकारने अंतिम वर्ष एटीकेटी व बॅकलॉग परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत, असे जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्याची परवानगी दिली. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पदविका व पदवीच्या बॅकलॉॅग, एटीकेटी व रेग्युलरच्या अंतिम वर्ष परीक्षेला केंद्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे.

Movement of Pharmacy Action Committee against the examination decision | परीक्षा निर्णयाविरोधात फार्मसी कृती समितीचे आंदोलन

परीक्षा निर्णयाविरोधात फार्मसी कृती समितीचे आंदोलन

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारविरुद्ध रोष : पदवी परीक्षा घेण्यास विरोध, ‘एटीकेटी’ सुरू ठेवण्याची मागणी, पालक-विद्यार्थी संभ्रमीत

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर फामर्स कृती समितीने सोमवारी आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून आंदोलनात सहभाग घेतला.
राज्य सरकारने अंतिम वर्ष एटीकेटी व बॅकलॉग परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत, असे जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्याची परवानगी दिली. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पदविका व पदवीच्या बॅकलॉॅग, एटीकेटी व रेग्युलरच्या अंतिम वर्ष परीक्षेला केंद्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखाच्यावर पोहोचली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे शक्य आहे का?, हा विचार केंद्र सरकारने करायला हवा, अशी मागणी कृती समितीने केली.
एकीकडे लॉकडाउन वाढवायचा आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना एकत्र आणून त्यांच्या जिवाला धोका पोहोचवायचा, यात शहाणपण कसले, हे केंद्र सरकारने स्पष्ट करायला हवे. त्यामुळे पदविका आणि पदवीचा बॅकलॉग, एटीकेटी व रेग्युलर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्या, यासाठी पहिल्या टप्प्यात आंदोलन केले. या आंदोलनातून निर्णयाला श्रद्धांजली वाहिली.

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाला श्रद्धांजली
या अभिनव आंदोलनात केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घरी हातात मेणबत्ती व तोंडावर पट्टी बांधून सोशल मीडियावर निषेध व्यक्त करीत आंदोलनात सहभाग घेतला. पदविका आणि पदवीचा बॅकलॉग, एटीकेटी व रेग्युलर असलेल्या प्रथम, व्दितीय आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी व पालक यांनी आंदोलनात सहभागी होत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली, असे फार्मसी कृती समितीने जिल्हाध्यक्ष सुंदर नाईक, उपाध्यक्ष साद खान यांनी सांगितले.

Web Title: Movement of Pharmacy Action Committee against the examination decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.