एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असला तरी त्यातील काही कर्मचारी कामावर येत आहे. एसटीला सध्या चालक आणि वाहकांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेइतकी वाढत नसल्याने खासगी कंपनीकडून चालक उपलब्ध करून घेतले जात आहे. यवतमाळ विभागाकरिता ७५ चालक उपलब्ध होतील, अशी मा ...
शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने भावी शिक्षकांना तर अडचणीत आणलेच आहे, मात्र त्यासोबतच टायपिंग व शॉर्टहॅण्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणीत आणले आहे. ...
सुरेशचंद तातेड (रा. बाभूळगाव) हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वाहनाने अमरावती जिल्ह्यातील धनोडी येथे जात होते. यावेळी चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन भरधाव वेगाने रस्ता दुभाजकावर आदळले. यामुळे वाहनात बसलेले प्रवासी समोरील काच फुटल्याने र ...
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलीस पथकांनी वसंतनगर, काळीदौलत, पुणे, नागपूर, सोलापूर अशा विविध ठिकाणांवरून गुन्ह्यातील आरोपींची धरपकड केली. यातील मुख्य आरोपी नितीन लक्ष्मण शास्त्रकार याला नागपुरातून ताब्यात घ ...
दारव्हा-यवतमाळ मार्गावरील लाडखेड फाट्याजवळ भरधाव कार झाडावर आदळली. या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. निशांत नेमाडे (वय २३) आणि अनुराग भगत (२४, दोघे रा. दारव्हा) अशी मृतांची नावे ...
मंगळवारी रात्री दरम्यान दोन चोरट्यांनी मोटवाणी यांच्या उघड्या खिडकीतून ग्रील अलगद काढली. हे करताना कुठलाही आवाज होऊ दिला नाही. थेट घरात प्रवेश केला. मोटवाणी व त्यांची पत्नी झोपून असलेल्या खोलीचे दार बंद केले. त्यानंतर दाराला बांधून ठेवले. पुढच्या खोल ...
पुष्पकुंज सोसायटीमध्ये आजी-आजोबा व नात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या तिघांना वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवले नंतर शांतपणे दोन कपाट फोडून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ...
सोमवारी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाचजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण साखरा गावात सामसूम असून गावात एकाही घरी चूल पेटली नाही. ...