कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली. ...
शहर आणि जिल्ह्याच्या विकासकामांचा ध्यास घेतलेले माजी खासदार तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा दसºयाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात आले आहेत. ...
विद्यार्थ्यांनी गणवेशाच्या ४०० रुपयांसाठी उघडलेल्या बँक खात्यालाही ‘मिनिमम बॅलेन्स’ ठेवण्याची अट लावण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताचे कात्रण घेऊन ..... ...
दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे. ...
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वित्त व बांधकाम सभापती मिनिष मानकर यांनी केले. ते पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. ...