दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे. ...
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वित्त व बांधकाम सभापती मिनिष मानकर यांनी केले. ते पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. ...
तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. बुधवारी ३ वाजतानंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि गुरूवारपासून प्रचाराची रणधुमाळी १९ गावांमध्ये सुरू झाली. ...
प्रख्यात संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर तथा त्यांच्या कन्या राधा मंगेशकर यांच्याद्वारे गत ५० वर्षांपासून जगभर पसरलेल्या मराठी श्रेत्यांच्या मनावर अविट छाप ठेऊन असलेल्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमाने वणीकर श्रोते मंत्रमुग्ध झालेत. ...
तालुक्यातील काही नागरिकांकडे बनावट जातीचे दाखले आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला आहे. ...
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला अकस्मात भेट देऊन जणू सर्जिकल स्ट्राईक केला. त्यांनी स्वत:ची फारशी ओळख न देता सलग दोन वेळा तेथील स्थितीची पाहणी केली. ...
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळात आले, परंतु त्यांनी येथील प्रमुख तीन ज्वलंत विषयांकडे पाठ फिरविली. ...