शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. ...
राज्यातील सर्व जिल्ह्याचे रोस्टर पूर्ण करून मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याच्यादृष्टीने कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना येथे दिले. यावेळी माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. ...
खोटे दस्तावेज तयार करून मालमत्तेचे अधिक मूल्यांकन दाखवत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या लोहारा शाखेतून तब्बल ९५ लाख रुपयांची उचल केली गेली. या प्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून दोन वकीलांसह चौघांवर लोहारा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांमधील वर्चस्वाचा वाद संपण्याची चिन्हे नाहीत. आर्णीतील एक काम आपल्याच मर्जीतील व्यक्तीला मिळावे, यासाठी अध्यक्ष व बांधकाम सभापती पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकल्याचे सांगितले जाते. ...
साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मांडली. ...
शासन दरबारी आदर्श गाव म्हणून नोंद असलेला पिंपळदरीचा दिव्यांग व्यक्ती मात्र घरकुलापासून वंचित आहे.दोन्ही पाय निकामी झालेला हा तरुण चाकाच्या गाड्यावर बसून गावा-गावात भीक मागतो. ...