शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात डेंग्यू, टायफाईड व मलेरियाचा झाला शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात नालीतून पाणी वाहून जात असल्याने आपसुकच नाली सफाई होते, ही भावना सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही विशिष्ट भागातीलच नाली सफाई होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांतील नालीतून दुर्गंधी येत असून, नागरिकांना नाली परिसरात उभे राहणेही कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने  शहरात आता मलेरिया, टायफाइडसह डेंग्यू आजाराचे थैमान घातले आहे. सरकारी रुग्णालयात रुग्णाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाकडे रुग्णांचा वाढता कल वाढला आहे. त्यामुळे सध्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक खासगी रुग्णालये हाउसफुल झाल्याची चित्र आहे.पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात नालीतून पाणी वाहून जात असल्याने आपसुकच नाली सफाई होते, ही भावना सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही विशिष्ट भागातीलच नाली सफाई होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांतील नालीतून दुर्गंधी येत असून, नागरिकांना नाली परिसरात उभे राहणेही कठीण झाले आहे. परिणामी, विविध आजारांना निमंत्रण देणाऱ्या डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील अनेक भागांत तापाची साथ सुरू असून, दररोज डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातून दररोज शेकडो रुग्ण येतात, परंतु डॉक्टरांच्या कमतरतेमुळे व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बरेचदा या रुग्णांना दाखल करून घेतल्या जात नाही. विशिष्ट वेळेत याल तरच उपचार करू, अशी भूमिका या रुग्णालयाची असल्याचा आरोप रुग्ण करीत असून, दिलेल्या वेळेतच आजारी पडावे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  हीच अवस्था तालुक्यातील ग्रामीण भागातही असून, तिथेही इतर आजारासोबतच डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. चिखलमय रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, अस्वच्छ पिण्याचे पाणी यामुळे ग्रामीण भागात डेंग्यू आजार जोर पकडत आहे. तालुक्यात वाढते आजार पाहता, हिवताप तपासणी मोहीम राबवून डासांचे नियत्रंण करण्यासाठी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संततधार पाऊसच ठरतोय घातक- या वर्षी तालुक्यात अर्धा पावसाळा संपला, तरी मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे शहरातील व गावातील घाण व काडी कचरा वाहून गेला नाही. गेल्या आठवड्यात रिपरिप पाऊस सुरू होता. त्यामुळे ही घाण सडून चिखलाचे साम्राज्य वाढून रोगराईला चालना मिळाली. यामुळे आजारात वाढ होत आहे, तसेच वातावरणातही सतत बदल होत असून, दिवसभर उन्ह व सावलीचा खेळ सुरू असतो. वातावरणातील या बदलांमुळेही अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. विशेषत: या बदलत्या वातावरणाचा लहान मुलांना चांगलाच फटका बसत आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यू