शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

वणी उपविभागात बोंडअळीचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

ऐन सोयाबीनला शेंगा फुटण्याच्यावेळी पावसाला आरंभ झाला. हा पाऊस पुढे अनेक दिवस कायम होता. परिणामी शेंगात दाणे भरल्यानंतर या पावसामुळे दाण्यांना अंकुर फुटले. सोयाबीनने रंग बदलला. ज्या शेतात एकरी १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होेणे अपेक्षित होते. त्या शेतात एकरी ८० किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले. कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला.

ठळक मुद्देसोयाबीनची झाली माती : यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी ठरतोय मारक, पीक वाचविण्यासाठी केली जातेय धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच वणी उपविभागातील शेतकरी संकटात सापडला आहे. अती पावसाने सोयाबीनची माती झाली. आता कापसावरही बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी कमालिचा हतबल झाला आहे. यंदा हे दोनही नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.वणी तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात बोंडअळीने दस्तक दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कपाशीवर बोंडअळीचा हल्ला होत आहे. यंदा मात्र त्याचे स्वरूप अतिशय तीव्र आहे. त्यामुळे जो कापूस फुटून आहे, तेवढाच कापूस शेतकऱ्यांच्या हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उर्वरित कापसाची बोंडे गुलाबी अळ्या पोखरत आहे. निसर्गाच्या या संकटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहेत. यावर्षी परतीच्या पावसाने विलंब केला.ऐन सोयाबीनला शेंगा फुटण्याच्यावेळी पावसाला आरंभ झाला. हा पाऊस पुढे अनेक दिवस कायम होता. परिणामी शेंगात दाणे भरल्यानंतर या पावसामुळे दाण्यांना अंकुर फुटले. सोयाबीनने रंग बदलला. ज्या शेतात एकरी १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होेणे अपेक्षित होते. त्या शेतात एकरी ८० किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले. कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. कापूस विकून कर्जाची परतफेड करू, अशी स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र बोंडअळीने निराशा केली. परतीच्या पावसाने अनेक शेतातील फुटलेला कापूस ओला झाला. ओला कापूस बाजारात नेऊन विकताना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लुट सुरू केली. शेतकऱ्यांची सध्या तरी केवळ एकच वेचाई झाली आहे. उर्वरित प्रत्येक बोंडात गुलाबी बोंडअळीने शिरकाव केला. ह्या अळ्या आता कापसाची बोंडे पोरखत आहे. या अळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर प्रयत्न करित असले तरी त्यात फार यश येत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे यंदा कापूस उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे.मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याएकीकडे सोयाबीनचे पीक शेतातच सडले. दुसरीकडे कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला. जो कापूस निघाला, तो वेचण्यासाठीही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या आहे. दरवर्षी वणी, झरी व मारेगाव या तालुक्यांमध्ये चंद्रपूर, नांदेड व अन्य जिल्ह्यातून मजूर हंगामासाठी येतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे मजुरांनी या भागात पाठ फिरविली आहे. परिणामी स्थानिक मजुरांचे भाव वधारले असून विनंत्या, आर्जव करूनही स्थानिक मजूर काम करण्यासाठी शेतात येत नसल्याचे शेतकरी सांगतात.

टॅग्स :agricultureशेती