शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

27 हजार 698 पैकी केवळ 63 विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 5:00 AM

परीक्षेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील १४ हजार २८८ मुले आणि १३ हजार ४२० अशा २७ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १४ हजार २३३ मुले आणि १३ हजार ४०२ मुली असे २७ हजार ६३५ म्हणजेच ९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.८६ टक्के इतके आहे. 

ठळक मुद्दे९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण : काॅमर्स शाखेचा १०० टक्के तर कला ९९.९४ तर विज्ञान शाखेचा ९९.४९ टक्के निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही यवतमाळ जिल्ह्याने या निकालात बाजी मारली आहे. अमरावती विभागात यवतमाळ अव्वल ठरला असून जिल्ह्याचा ९९.७७ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कॉमर्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदा केवळ ६३ विद्यार्थी नापास झाले आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाचे १८ विद्यार्थीही परीक्षेत अयशस्वी ठरले.परीक्षेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील १४ हजार २८८ मुले आणि १३ हजार ४२० अशा २७ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १४ हजार २३३ मुले आणि १३ हजार ४०२ मुली असे २७ हजार ६३५ म्हणजेच ९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.८६ टक्के इतके आहे. सात तालुक्यांचा १०० टक्के निकाल मंगळवारी जाहीर झालेला इयत्ता बारावीचा निकाल सर्वार्थाने उच्चांकी ठरला. जिल्ह्यातील तब्बल पाच तालुक्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये वणी, झरी जामणी, पांढरकवडा, मारेगाव, आणि बाभूळगाव  या तालुक्यांचा समावेश आहे.  दरम्यान, यंदा बारावीची लेखी परीक्षा प्रत्यक्ष न झाल्याने मागील वर्षीच्या मूल्यांकनावर निकाल लावल्याने टक्का वाढल्याचे दिसत आहे. 

वाणिज्यसह जुन्या अभ्यासक्रमाचाही १०० टक्के निकाल

- यंदा बारावी परीक्षेत विक्रमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यातही कॉमर्स शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेला दोन हजार ४७६ विद्यार्थी बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या बरोबरच सायन्सच्या जुन्या अभ्यासक्रमाचेही सर्वच्या सर्व १८४ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. - कॉमर्स शाखेतून १२२६ मुले आणि १२५० मुली अशा एकूण २४७६ जणांनी परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहे. विज्ञान शाखेतून पाच हजार ५५० मुले आणि पाच हजार २०१ अशा दहा हजार ७५१ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील दहा हजार ६९७ म्हणजेच ९९.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. - कला शाखेतून सहा हजार ७२४ मुले आणि सहा हजार ७३८ मुली अशा १३ हजार ४६२ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १३ हजार ४५४ म्हणजेच ९९.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.- व्होकेशनलमधून ७७८ मुले आणि २३१ मुली अशा एक हजार ९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यातील एक हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९९.९० लागला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाचाही यंदा घवघवीत निकाल लागला आहे. - विज्ञान शाखेतून १२५ मुले आणि ५९ मुली अशा १८४ जणांनी परीक्षा दिली होती. हे सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेच्या जुन्या अभ्यासक्रमासाठी ७८२ मुले आणि २७१ मुली अशा १०५३ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १०५२ म्हणजेच ९९.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. - वाणिज्य शाखेच्या जुन्या अभ्यासक्रमाचाही १०० टक्के निकाल लागला आहे. परीक्षा दिलेले सर्व ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याच बरोबर जुन्या अभ्यासक्रमातून व्होकेशनलसाठी बसलेले सर्व १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

कला शाखेतील सर्वाधिक विद्यार्थी फेल- बारावीच्या परीक्षेत मूल्यमापन करताना महाविद्यालयांतर्गत घेतल्या गेलेल्या विविध चाचण्या, प्रात्यक्षिक आणि मागील वर्षाच्या एकूण मूल्यांकनावर विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात आले. याशिवाय काही विद्यार्थी नाव टाकल्यापासून काॅलेजकडे फिरकलेच नाही. तर काहींनी कुठल्याही परीक्षा, टेस्ट, प्रॅक्टीकल सादर केले नाही. असे विद्यार्थी परीक्षेत नापास झाले. यामध्ये कला शाखेतील ३८ मुले आणि १६ मुली, वाणिज्य शाखेतील सात मुले, एक मुलगी तर विज्ञान शाखेतील एक मुलगी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाली आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल