शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची, मात्र उत्तरे देणार देशाचे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:05 PM

दहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी!

ठळक मुद्देदहावी, बारावीच्या परीक्षांचे टेन्शन मोदी करणार कमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी! गडबडून जाऊ नका, या प्रश्नोत्तराचा परीक्षेशी संबंध नाही, संबंध आहे तो केवळ परीक्षेचे टेन्शन कमी करण्याचा. विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी चक्क पंतप्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी अभ्यासाच्या तणावात आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताण तणावातून मुक्त करण्यासाठी १६ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या शंकांची उत्तरे देणार आहेत. दिल्लीत हा संवाद कार्यक्रम होणार असून देशभरात त्याचे टीव्ही, रेडिओ, यूट्यूब चॅनल, फेसबुक आदींद्वारे थेट प्रसारण केले जाणार आहे.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. त्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत ‘माय गव्हर्मेंट’ या संकेतस्थळावर इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून प्रश्न नमूद करावा लागणार आहे. या प्रश्नांचा समावेश मोदींच्या कार्यक्रमात होणार असून १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ या एक तासात त्याची उत्तरे पंतप्रधान देणार आहेत.हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत दाखविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यासाठी १६ फेब्रुवारीला शाळेत टीव्ही, प्रोजेक्टर असे आवश्यक साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना आहेत. विशेष म्हणजे, १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत दहावीच्या तोंडी परीक्षा आहेत.परंतु, पंतप्रधानांच्या ‘संवाद’ कार्यक्रमासाठी १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ हा एक तास तोंडी परीक्षेच्या नियोजनातून वगळावा, असेही निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत.

‘नमों’च्या पुस्तकावर विचारा प्रश्नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक नुकतेच ३ फेब्रुवारीला प्रकाशित झाले आहे. परीक्षांमधील मानसिक ताण-तणावाचा विषय त्यात पंतप्रधानांनी हाताळला आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात या पुस्तकाविषयी विशेष करून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे, अशी अपेक्षाही शिक्षण खात्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी