शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

जिल्ह्यातील तीनही पक्षांतील आमदारांना संधी; अखेर मंत्रिपदाचा बॅकलॉग निघाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:57 IST

Yavatmal : २००९ नंतर पहिल्यांदाच मिळाले तीन मंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्याचे राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व राहिले आहे. येथील आमदार हेवीवेट म्हणूनच ओळखल्या गेले आहेत. २००९ मध्ये जिल्ह्यातून तीन कॅबिनेट मंत्री होते. सत्ता बदल झाल्यानंतर जिल्ह्याचे राज्यमंत्री मंडळातील प्रतिनिधी कमी झाले. १५ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आता जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. यामुळे मंत्रिपदाचा बॅकलॉग भरून निघाला आहे.

महायुतीत असलेल्या तीनही पक्षांतील आमदारांना संधी देण्यात आली आहे. यात भाजप व शिंदेसेनेला कॅबिनेट दर्जा तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून राज्यमंत्री दर्जा देण्यात आला. निवडणूक निकालानंतर मंत्री कोण राहणार याविषयी उत्सुकता होती. संजय राठोड, डॉ. अशोक उईके, इंद्रनील नाईक यांचीच नावे संभाव्य म्हणून चर्चेत होती. या तिघांनी रविवारी नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१९ मध्ये भाजपचे अशोक उईके यांना केवळ चार महिने कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली, नंतर त्यांना आता पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. राळेगाव, पुसद, दिग्रस येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

चौथ्यांदा घेतली शपथ आमदार संजय राठोड यांनी डिसेंबर २०१४ मध्ये राज्यमंत्री, डिसेंबर २०१९ मध्ये वनमंत्री, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वस- नमंत्री, ऑगस्ट २०२२ मध्ये अन्न व औषधी प्रशासन त्यानंतर २०२३ मध्ये मृद, जलसं- धारणमंत्री म्हणून काम केले. आता चौथ्यांना शपथ घेतली.

दुसऱ्यांदा मंत्रिपदप्रा.डॉ. अशोक उईके यांना २०१९ मध्ये केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ मंत्री म्हणून मिळाला. त्यानंतर, दीर्घकाळ ते प्रतीक्षेत राहिले. आता त्यांनी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. स्वच्छ प्रतिमा आणि मितभाषी आहे. पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. 

१० वर्षानंतर लाल दिवा नाईक घराण्यात २०१४ पासून मंत्रिपद नव्हते. हा दीर्घकालावधी राहिला. दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्री- पदाची शपथ घेतली. यामुळे पुसद येथील नाईक बंगल्याला पुन्हा एकदा लालदिवा मिळाल्याने प्रतीक्षा संपली.

संजय राठोड यांचा मास्टर स्ट्रोक२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपासूनच संजय राठोड यांच्याबद्दल विविध प्रकारच्या वावड्या उडविल्या गेल्या. अगदी विधानसभेची निवडणूक राठोड पराभूत होतील, असेही दावे केले जात होते. विजयश्री खेचून आणत त्यांनी याला चोख उत्तर दिले. त्यानंतर, संजय राठोड यांचा संभाव्य मंत्रिमंड- ळातून पत्ताकट अशी चर्चा रंगू लागली. या चर्चेलाही राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन संपुष्टात आणले.

प्रा.डॉ. अशोक उईकेंनी केले कमबॅकजून २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या चार महिन्याच्या मंत्रिपदाच्या काळात अशोक उईके यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला. त्यामुळे भाजपकडून पहिल्या यादीत उईकेंना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारAshok Uikeअशोक उइकेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूरYavatmalयवतमाळ