ले-आऊटमधील आरक्षित जागांची खुलेआम विक्री

By Admin | Updated: March 20, 2015 01:57 IST2015-03-20T01:57:41+5:302015-03-20T01:57:41+5:30

शहरात टाकण्यात आलेल्या ले-आऊट मधील विविध विषयांकरिता आरक्षित असलेल्या जागांची अनधिकृतपणे विक्री केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Open Sale of reserved seats in Le-out | ले-आऊटमधील आरक्षित जागांची खुलेआम विक्री

ले-आऊटमधील आरक्षित जागांची खुलेआम विक्री

मुकेश इंगोले दारव्हा
शहरात टाकण्यात आलेल्या ले-आऊट मधील विविध विषयांकरिता आरक्षित असलेल्या जागांची अनधिकृतपणे विक्री केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यवहारात रजिस्टर खरेदी होऊ शकत नाही. त्यामुळे नोटरी करून प्लॉट विकल्या जात आहे. या आरक्षित जागेमधील प्लॉट घेऊन अनेकजण त्यावर बांधकाम करीत आहे, अशा अनधिकृत व अविकसीत वसाहती तयार होत असल्याने परिसरात राहणारे नागरीक त्रस्त आहे. या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
शहरात निर्माण होणाऱ्या ले-आऊटमध्ये नगर रचना विभागाकडून आवश्यकतेनुसार शैक्षणिक सह इतर विषयासाठी आरक्षण टाकण्यात येते. ले-आऊटधारकांना ते आरक्षण नियमानुसार हटविल्याशिवाय त्या जागेची विक्री करता येत नाही. परंतु आरक्षित जागेवरील आरक्षण हटविल्याशिवाय या जागांची खुलेआमपणे विक्री केल्या जात आहे. शहरात यापूर्वीसुद्धा असे प्रकार घडले असून, या जागेवर मोठमोठी नगरे तयार झाली आहे. प्रभाग क्रमांक एक मधील श्रीकृष्णनगरच्या बाजुची वसाहत आरक्षित जागेवरच तयार झाली आहे.
त्याचबरोबर सध्या नातुवाडी परसिरातील एका ले-आऊटमधील शैक्षणिक कामाकरिता राखीव असलेल्या जागेमधील प्लॉट घेऊन त्यावर अवैधरित्या बांधकाम केल्या जात आहे. या बांधकामाबाबत नातुवाडी परिसरातील नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली, परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून या जागेवर होणारे अवैध बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी आहे.

Web Title: Open Sale of reserved seats in Le-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.