शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

१४ वर्षात एकच क्रीडा संकुल

By admin | Updated: May 1, 2017 00:13 IST

ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुका ठिकाणी क्रीडा संकूल उभारण्याच्या शासनाच्या उद्देशाला यवतमाळ जिल्ह्यात हरताळ फासल्याचे दिसत आहे.

१३ कोटींचा निधी : १६ पैकी सहा तालुक्यांमध्ये कामाला सुरुवातच नाही नीलेश भगत  यवतमाळ ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुका ठिकाणी क्रीडा संकूल उभारण्याच्या शासनाच्या उद्देशाला यवतमाळ जिल्ह्यात हरताळ फासल्याचे दिसत आहे. १३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळूनही जिल्ह्यातील १६ पैकी केवळ एकाच तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे सहा तालुक्यात तर अद्यापही कामालाही हात लागला नाही. राज्यात प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी एक कोटी रुपयांचे तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने २६ मार्च २००३ रोजी घेतला होता. त्यानुसार तालुका क्रीडा संकूल बांधण्यासाठी सुरुवातीला २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र २००९ मध्ये यात घसघशीत वाढ करून हा निधी एक कोटी रुपये करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात क्रीडा संकूल उभारण्याला मान्यता दिली. त्यानुसार २००३ मध्ये जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, आर्णी, पुसद, वणी, उमरखेड, राळेगाव या सहा तालुक्यांसाठी निधी देण्यात आला. पुढे महागाव, कळंब, पांढरकवडा, नेर या तालुक्यांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये निधी दिला गेला. जिल्ह्याला तालुका क्रीडा संकूल उभारण्यासाठी आतापर्यंत १३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र आता १४ वर्ष झाल्यानंतरही पांढरकवड्याचा अपवाद वगळता इतर कुठलेही तालुका संकूल पूर्ण झाले नाही. पांढरकवडा येथील क्रीडा संकुलासाठी १०० टक्के निधीचा विनियोग करण्यात आला. २००३ मध्ये क्रीडा संकूल मंजूर झालेल्या आर्णी तालुक्यात सर्वाधिक ८७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्या खालोखाल नेर, दारव्हा तालुक्यात अनुक्रमे ७५ व ७२ लाख तर पुसदमध्ये ६७ लाख, वणी ६५ लाख, उमरखेड ४१ लाख, राळेगाव ४० लाख, महागाव २० लाख, कळंबमध्ये १५ लाख रुपये २०१६ पर्यंत खर्च झाले आहे. परंतु या ठिकाणचे एकही क्रीडा संकूल अद्याप पूर्णत्वास गेले नाही. दिग्रस येथे सर्वे नंबर १७ मधील १.१३ हेक्टर आर जागा क्रीडा संकुलासाठी प्राप्त झाली. त्यावर दहा लाख रुपये खर्च करण्यात आला. ही जागा कमी पडत असल्याने नवीन जागेसाठी आता धावाधाव करावी लागत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतच उघड झाला आहे. क्रीडा संकुलाच्या या निधीसोबतच प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडा विकास निधी अंतर्गत प्रशासकीय खर्च, प्रशिक्षक, कर्मचाऱ्यांचे मानधन, क्रीडा साहित्य, क्रीडांगण, देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी दिला जातो. यासोबतच क्रीडांगण विकास अनुदान, व्यायाम शाळा अनुदान आदी अनुदानही दिले जाते. शासनाने कोट्यवधी रुपये देऊनही केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागातील तालुका क्रीडा संकूल अद्यापही पूर्ण झाले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील खेळाडूंना बसत असून इतर क्रीडा संकुले कधी पूर्ण होणार हे मात्र कुणीही सांगायला तयार नाही.