शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराचे १४ पैकी केवळ चारच कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

येथील नगरपरिषद ‘अ’ वर्ग दर्जाची आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत कर वसुलीच आहे. मात्र कर वसुलीसाठी नागरिकांना दर्जेदार सोयी, सुविधा पुरविणेही गरजेचे असते. या सुविधा पुरवत असताना पालिकेची दमछाक होते. त्यातही कर वसुली होत नसल्याने सुविधांवर खर्च करणे पालिकेला अवघड जाते. सोयी, सुविधा मिळत नसल्याने नागरिकही कर भरताना हात आखडता घेतात.

ठळक मुद्देयवतमाळ पालिका : एक लाख मालमत्तांची कर वसुली अडकली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नगरपरिषदेच्या हद्दीत जवळपास एक लाख मालमत्ता आहे. त्यांच्याकडून करापोटी १४ कोटींची वसुली अपेक्षित असताना आत्तापर्यंत केवळ चारच कोटी वसूल झाले. आता उर्वरित अडीच महिन्यात कर वसुली होणार किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.येथील नगरपरिषद ‘अ’ वर्ग दर्जाची आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत कर वसुलीच आहे. मात्र कर वसुलीसाठी नागरिकांना दर्जेदार सोयी, सुविधा पुरविणेही गरजेचे असते. या सुविधा पुरवत असताना पालिकेची दमछाक होते. त्यातही कर वसुली होत नसल्याने सुविधांवर खर्च करणे पालिकेला अवघड जाते. सोयी, सुविधा मिळत नसल्याने नागरिकही कर भरताना हात आखडता घेतात. अनेक नागरिक सुविधा पुरवूनही कर भरताना का-कू करतात. यामुळे पालिकेला शहरात सुविधा उपलब्ध करून देताना आर्थिक निधीची अडचण जाते.मालमत्तांवर कर आकारून तो वसूल करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. कर वसुली झाल्यास पालिकेला शहरात सुविधा आणि विविध उपाययोजना आखणे सुलभ जाते. मात्र कर वसुली होत नसल्याने पालिकेला नागरिकांना सुविधा देताना दहादा विचार करावा लागतो. त्यातही येथील पालिका २० वर्षांपूर्वीच आकारलेला कर वसूल करीत आहे. त्यावेळी पालिका ‘ड’ वर्गात होती. त्यामुळे आत्ताही पालिका ‘अ’ वर्गात येत असूनही ‘ड’ वर्ग पालिकेप्रमाणेच कर वसुली केली जाते. त्यात पूर्ण कर वसूल होत नाही. त्यामुळे पालिकेपुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकते.यवतमाळ पालिकेत कर वसुलीची यंत्रणाही अपुरी आहे. ज्या यंत्रणेकडे ग्रामीण भागाची कर वसुली सोपविण्यात आली होती, त्या यंत्रणेने वसुलीच केली नाही. शहरी भागातही कर वसुलीचे उद्दीष्ट असताना केवळ जुन्या प्रभागाचीच वसुली करण्यात यश मिळाले. कर वसुलीसाठी २६ कर्मचाऱ्यांची चमू अपुरी पडत आहे. या चमूने १४ कोटींपैकी केवळ चारच कोटींची कर वसुली केली आहे. १० कोटींची वसुली अद्याप बाकी आहे. यामुळे यवतमाळ नगरपरिषदेची आर्थिक स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.सॉफ्टवेअरची गतीही मंदावलीकर वसुली करण्यासाठी पालिकेच्या कर विभागात संगणक बसविण्यात आले. मात्र ऑनलाईनची गती अतिशय मंदावली आहे. परिणामी कर जमा करण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकाला किमान अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते. संगणकाची गती मंदावल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागते. यामुळेही कर वसुलीवर परिणाम होत आहे.अद्ययावत सॉफ्टवेअर यंत्रणा नाहीकोणत्याही करदात्याला घरी बसूनच कर जमा करता येईल, यासाठी शासन अद्ययावत सॉफ्टवेअर विकसित करणार होते. यामुळे कर वसुलीची गती वाढून नागरिकांचा वेळही वाचणार होता. मात्र ही सॉफ्टवेअर यंत्रणा अद्यापही बसविण्यात आली नाही. त्यामुळेही वसुलीत अडचण निर्माण झाली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका