जल प्रकल्पात केवळ १८ टक्के पाणीसाठा
By Admin | Updated: May 31, 2014 00:11 IST2014-05-31T00:11:33+5:302014-05-31T00:11:33+5:30
सूर्य आग ओकत असल्याने असह्य उन्ह तापत असून याचा परिणाम जिल्ह्यातील जल प्रकल्पांवर होत आहे. जल प्रकल्पातील पाण्यात सपाट्याने घट होत असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे.

जल प्रकल्पात केवळ १८ टक्के पाणीसाठा
उन्हाचा परिणाम : सहा लघु प्रकल्प कोरडे
यवतमाळ : सूर्य आग ओकत असल्याने असह्य उन्ह तापत असून याचा परिणाम जिल्ह्यातील जल प्रकल्पांवर होत आहे. जल प्रकल्पातील पाण्यात सपाट्याने घट होत असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे. सहा प्रकल्प तर कोरडे पडले आहे.
मे अखेरीस सूर्य आग ओकायला लागला. पारा ४३ अंशाच्या घरात आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होत आहे. यातून प्रकल्पातील पाण्यात कमालीची घट नोंदविली जात आहे. गत १५ दिवसात तीन लघु प्रकल्प पुन्हा कोरडे पडले आहे. आता कोरडे पडलेल्या प्रकल्पाची संख्या सहा झाली आहे. जिल्ह्यातील मोठय़ा व मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीतही घट नोंदविली जात आहे. पावसाळा लांबला तर प्रकल्प कोरडे पडण्याचा धोका आहे.
जिल्ह्यातील लोहतवाडी, नेर, दुधाणा, बोर्डा, अंतरगाव आणि पहूर इजारा हे प्रकल्प कोरडे पडले आहे. तर इतर प्रकल्पामध्ये २१.५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. या साठय़ाची टक्केवारी १८.४४ टक्के आहे. जिल्ह्यातील मोठय़ा पूस प्रकल्पात २१.८१ दलघमी पाणी आहे. या ठिकाणी जल प्रकल्पाच्या क्षमतेच्या तुलनेत २७ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्पांची स्थितीही चिंताजनक आहे. गोखी प्रकल्पात ११.५७ दलघमी, वाघाडी प्रकल्पात ११.९२ दलघमी, सायखेडा प्रकल्पात ११.३३ दलघमी, लोअरपूस प्रकल्पात ३५.८४ दलघमी आणि बोरगाव प्रकल्पात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तळपत्या उन्हाळामुळे पाण्यात मोठी घट होत आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणार्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पही तळाला लागले आहे. पावसाळा लांबल्यास शहराच्या पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)