केळापूरच्या जगदंबेला एक किलो सोने दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:34 IST2018-10-13T23:33:18+5:302018-10-13T23:34:18+5:30
केळापूर येथील प्रसिद्ध श्री जगदंबा मातेच्या मंदिराला पुणे येथील राज इन्फोटेकचे संचालक जगदीश कदम यांनी देवीच्या मुकूटासाठी एक किलो सोन्याची देणगी दिली आहे.

केळापूरच्या जगदंबेला एक किलो सोने दान
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : केळापूर येथील प्रसिद्ध श्री जगदंबा मातेच्या मंदिराला पुणे येथील राज इन्फोटेकचे संचालक जगदीश कदम यांनी देवीच्या मुकूटासाठी एक किलो सोन्याची देणगी दिली आहे.
केळापूर जगदंबा संस्थानच्या सभागृहात एका छोटेखानी समारंभात संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांना ही देणगी सुपूर्द करण्यात आली. यावेळी संस्थानचे सचिव शंकर बडे, विश्वस्त प्रेमराव वखरे, दीपक कापर्तीवार, चंद्रशेखर पोलाडीवार, काशिनाथ शिंदे व गावकरी उपस्थित होते. जगदंबा संस्थानच्या विकासासाठी आपण आपल्या परीने शक्य तेवढी मदत यानंतरही करू, असे जगदीश कदम यांनी सांगितले. संस्थानचे सचिव शंकर बडे यांच्याहस्ते कदम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सुविद्य पत्नी व मुलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. केळापूर संस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त आंध्रप्रदेश, मराठवाड्यातील भाविकांची गर्दी उसळते.