ट्रक-कार अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:22+5:30
चंद्रपूर येथून एक ट्रक (एम.एच.३४/ए.बी.१८४१) लिक्वीड सिमेंट घेवून सुकळी कॅम्प येथे जात होता. या ट्रकने यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनपूर फाट्यानजीक समोर जाणाऱ्या कारला (एम.एच३८/३२९४) धडक दिली. यामुळे कार पलटी झाली. त्यातील चार जण जखमी झाले. ट्रकसुद्धा अपघातानंतर पलटी झाला. त्यात चालक जितेंद्र भुवाल ठाकूर (३०) रा.रामनगर जि.बलिया केबिनमध्ये अडकला.

ट्रक-कार अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : चंद्रपूरवरून सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
चंद्रपूर येथून एक ट्रक (एम.एच.३४/ए.बी.१८४१) लिक्वीड सिमेंट घेवून सुकळी कॅम्प येथे जात होता. या ट्रकने यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनपूर फाट्यानजीक समोर जाणाऱ्या कारला (एम.एच३८/३२९४) धडक दिली. यामुळे कार पलटी झाली. त्यातील चार जण जखमी झाले. ट्रकसुद्धा अपघातानंतर पलटी झाला. त्यात चालक जितेंद्र भुवाल ठाकूर (३०) रा.रामनगर जि.बलिया केबिनमध्ये अडकला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान या अपघातप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिरभाते यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.