एका मृत्युसह जिल्ह्यात 81 जण पॉझेटिव्ह, 74 कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:28 IST2021-02-16T17:27:34+5:302021-02-16T17:28:02+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 408 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 81 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 327 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

With one death, 81 people in the district tested positive, 74 corona-free | एका मृत्युसह जिल्ह्यात 81 जण पॉझेटिव्ह, 74 कोरोनामुक्त

एका मृत्युसह जिल्ह्यात 81 जण पॉझेटिव्ह, 74 कोरोनामुक्त

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 408 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 81 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 327 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

यवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात एका मृत्युसह 81 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 74 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 408 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 81 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 327 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 612 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15353 झाली आहे. 24 तासात 74 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14302 आहे. तर जिल्ह्यात एकूण 439 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 148431 नमुने पाठविले असून यापैकी 148127 प्राप्त तर 304 अप्राप्त आहेत. तसेच 132774 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: With one death, 81 people in the district tested positive, 74 corona-free