दीडशे ‘टॉप’ थकबाकीदार निशाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:07+5:30
बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी एम.डी. सिंह जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देणार आहे. यावेळी विविध बाबींचा आढावा घेऊन कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने चालविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना टीप्स् देणार आहेत. कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवला जाणार आहे. त्याच वेळी दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहे.

दीडशे ‘टॉप’ थकबाकीदार निशाण्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ६५० कोटी रुपये कर्ज बुडित असून यातील ‘बीगबजेट’ टॉप दीडशे थकबाकीदार जिल्हाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान त्यांच्यावरील कारवाईची दिशा निश्चित करण्यासाठी बुधवारी बँकेचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह जिल्हा बँकेत धडकणार आहेत.
बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी एम.डी. सिंह जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देणार आहे. यावेळी विविध बाबींचा आढावा घेऊन कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने चालविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना टीप्स् देणार आहेत. कर्जासाठी शेतकºयांना कोणताही त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवला जाणार आहे. त्याच वेळी दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहे.
बँकेचे ६५० कोटी कर्ज बुडित (एनपीए) आहे. त्यातील मोठ्या दीडशे थकबाकीदारांची नावे वेगळी काढण्यात आली. वसुलीसाठी जप्ती व पुढील कारवाईवर फोकस निर्माण केला जाणार आहे. कोर्ट-कचेरी सुरू असलेल्या प्रकरणात न्यायालयात बँकेची बाजू भक्कमपणे मांडली जाणार आहे.
तारणाच्या चक्क दुप्पट कर्ज !
काही कर्ज राजकीय दबावाने तर काही तारणाच्या दुप्पट दिले गेले आहे. तारण संपत्ती विकूनही कर्जाची रक्कम वसूल होत नाही. कित्येक प्रकरणात धाक दाखवून कर्ज मंजूर करून घेतले आहे. काही प्रकरणे संचालकांच्या मौखिक शिफारसीवरून मंजूर केली गेली आहे. अनेक कर्ज संचालकांच्या परिवारातील संस्था, सदस्यांनाही दिले गेल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी आता या ६५० कोटींच्या बुडित कर्जाच्या वसुलीसाठी काय भूमिका घेतात याकडे नजरा आहेत.
साखर कारखाना, जिनिंग, पतसंस्था, मिलचा समावेश
या दीडशे थकबाकीदारांमध्ये वसंत सहकारी साखर कारखाना, सर्वसेवा व्यापारी संकुल, नागरी पतसंस्था, यवतमाळ, आर्णी, महागाव, दारव्हा तालुक्यातील जिनिंग, नेर तालुक्यातील ऑईलमिल आदींचा समावेश आहे. या टॉपटेन दीडशेसह विविध कर्जदारांना दिलेले कर्ज हे तारणाच्या दुप्पट आहे. त्यामुळे या कर्जाच्या पूर्ण वसुलीची शक्यता नाही. त्याचा फटका बँकेला बसणार आहे.