यवतमाळ : टीनपत्रे अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:31 IST2023-04-27T19:31:18+5:302023-04-27T19:31:33+5:30
ही घटना तालुक्यातील टाकळी (बु) येथे बुधवारी रात्री घडली.

यवतमाळ : टीनपत्रे अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू
मुकेश इंगोले
दारव्हा (यवतमाळ) : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात घरावरील टीनपत्रे अंगावर पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील टाकळी (बु) येथे बुधवारी रात्री १० वाजता घडली. कुंवरसिंग भगवानसिंग तोवर (५९) असे मृताचे नाव आहे.
कुंवरसिंग यांचे घर नुकतेच बांधण्यात आले आहे. या पक्क्या घराजवळ जुन्या टीनपत्राच्या खोलीत ते बुधवारी झोपले होते. त्यावेळी अचानक आलेल्या वादळी पावसात नवीन बांधकामाची भिंत टीनाच्या खोलीवर पडली. यावेळी टीनपत्रांमुळे त्यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.