शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भीसीतील फसवणुकीचा आकडा ५० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

भीसीत फसवणूक करणारे व फसविले गेलेले अशा सर्वांची यादी बनविली जात आहे. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसली तरी भीसी व्यवसायातून चालणारी अवैध सावकारी, त्यातील गुंडांचा शिरकाव यामुळे पोलीस स्वत:हून या प्रकरणात अनेकांना रेकॉर्डवर आणण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षकांवर नजरा : ऑर्गनायझर, सबआॅर्गनायझरच्या नावांची पोलिसांकडून जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीसीतून झालेल्या फसवणुकीचा आकडा ५० कोटींपेक्षा अधिक असून तो ७० कोटींपर्यंत असण्याची शक्यता व्यापाऱ्यांच्या वर्तुळातून वर्तविली जात आहे. दरम्यान ‘लोकमत’मधील भीसीच्या वृत्तमालिकेवर अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने लक्ष केंद्रीत केले असून या कार्यालयाची यंत्रणा भीसीतील आॅर्गनायझर, सबऑर्गनायझर तसेच फसविले गेलेल्या व्यापारी, व्यावसायिकांच्या नावाची जुळवाजुळव करीत असल्याची माहिती आहे.यवतमाळ शहरात भीसी व्यवसायातील खूप मोठा ‘झोल’ उघडकीस आला आहे. ‘लोकमत’ने त्यावर प्रकाशझोत टाकला. स्थानिक पोलीस प्रशासनाने भीसीच्या या व्यवहारात अद्याप तक्रार नाही अशी सबब पुढे करून ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. परंतु ‘लोकमत’ची भीसीवरील वृत्तमालिका अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे व त्यांच्या अधिनस्त यंत्रणेच्या नजरेतून सुटलेली नाही. महानिरीक्षक कार्यालयाने भीसीतील या फसवणुकीच्या प्रकारावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकरणात विविध मुद्यांवर प्राथमिक माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर चौकशीची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जाते.भीसीत फसवणूक करणारे व फसविले गेलेले अशा सर्वांची यादी बनविली जात आहे. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसली तरी भीसी व्यवसायातून चालणारी अवैध सावकारी, त्यातील गुंडांचा शिरकाव यामुळे पोलीस स्वत:हून या प्रकरणात अनेकांना रेकॉर्डवर आणण्याच्या तयारीत आहे. एकदा रेकॉर्डवर आणून नंतर भीसी व्यवसायाची पाळेमुळे खणण्याची व त्यातून अवैध सावकारांवर जरब निर्माण करण्याची पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची व्युहरचना असल्याची माहिती आहे.कारवाईचा फोकस जाजू चौक, सरदार चौक, मेनलाईनवरभीसीच्या या व्यवसायात ऑर्गनायझर कोण?, त्यांचे सबऑर्गनायझर कोण?, कुणाची किती आर्थिक क्षमता, त्यांची कार्यालये कुठे, त्यांचे नेमके सदस्य (विविध क्षेत्रातील व्यापारी, व्यावसायिक) कोण?, प्रत्येकाचे कुणाकडे किती खाते, भीसीतील पैसा नेमका कोणत्या अवैध सावकाराकडे जातो, कुणी किती रक्कम बुडविली, ही रक्कम आयपीएल क्रिकेट सट्ट्यात हारली का की, इतरत्र गुंतवणूक करून भीसीच्या सदस्यांपुढे नादारी घोषित केली, कुण्या ऑर्गनायझरला गुन्हेगारी वर्तुळातील नेमके कुणाचे पाठबळ, हे ऑर्गनायझर शहरातील गुंडांच्या नेमक्या कोणत्या टोळीशी कनेक्ट आहेत, आदी मुद्यांवर माहिती मिळविण्यासाठी महानिरीक्षक कार्यालयाचा फोकस राहणार आहे. प्रकरणाची व्याप्ती पाहता चौकशीची सूत्रेच महानिरीक्षक कार्यालयाकडे राहण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी