आता उपविभागीयस्तरावर तालुक्यांचा आढावा
By Admin | Updated: June 28, 2015 23:59 IST2015-06-28T23:59:25+5:302015-06-28T23:59:25+5:30
यवतमाळ : तालुकास्तरावर प्रलंबित कामे तातडीने निकाली काढण्यासोबतच यंत्रणेला गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह उपविभागीय स्तरावर तालुक्यांचा आढावा घेणार आहे.

आता उपविभागीयस्तरावर तालुक्यांचा आढावा
२ जुलैपासून सुरूवात : तहसीलसह सर्वच कार्यालयांची बैठक
यवतमाळ : तालुकास्तरावर प्रलंबित कामे तातडीने निकाली काढण्यासोबतच यंत्रणेला गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह उपविभागीय स्तरावर तालुक्यांचा आढावा घेणार आहे. यानुसार पहिली आढावा बैठक २ जुलै रोजी बचत भवन दारव्हाला होत आहे.
दारव्हा येथे दारव्हा व नेर तालुक्यांचा आढावा घेतला जाईल. ३ जुलै रोजी उमरखेड येथे उमरखेड व महागाव, ४ जुलै रोजी यवतमाळ व बाभुळगाव, ७ जुलै रोजी राळेगाव व कळंब, ८ जुलै रोजी पांढरकवडा येथे केळापूर, घाटंजी व झरी, ९ जुलै रोजी वणी व मारेगाव, १० जुलै रोजी पुसद येथे पुसद व दिग्रस या तालुक्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.
यावेळी शुन्य प्रलंबितता, सहा गठ्ठेपध्दत, अभिलेख अद्यावतीकरण, नागरिकांची सनद, तक्रारपेटी व नोंदवही, माहिती अधिकार, कार्यालयात दलालांवर बंदी घालणे, कर्तव्यसुची, कार्यविवरण, प्रलंबितता प्रकरणाची नोंदवही, नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, कनिष्ठ लिपीक यांचे कामकाज संबंधी कायदे, नियम, निर्णय, योजना याबाबत माहिती, संक्षिप्त टिपण आदींचा आढावा तसेच निरिक्षण होणार आहे. बैठकीला तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व सर्व विभागाच्या पर्यवेक्षीय कर्मचारी यांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. प्रत्यक्ष उपविभागीय स्तरावर जाऊन शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. एकंदर तालुकास्तरावरील प्रशासन गतिमान करण्यासाठी हा उपक्रम आहे. (कार्यालय प्रतिनिधी)