शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

आता सिंचन विहिरींचेही दिले पालकत्व

By admin | Updated: March 12, 2015 02:16 IST

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईने रखडलेल्या सिंचन विहीरी पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्याच अधिकारी कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईने रखडलेल्या सिंचन विहीरी पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्याच अधिकारी कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या २२९२ विहिरींची जबाबदारी ४५८ कर्मचाऱ्यांवर दिली असून त्यांना या विहिरींचे जणू पालकमंत्रीच करण्यात आले आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी सिंचन विहिरी देण्यात आल्यात. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक हजार विहिरी देण्याचे ठरविण्यात आले होते. १६ हजार विहिरींपैकी १४ हजार ८४५ शेतकरी विहिरीसाठी पात्र ठरले. विहिरींसाठी प्रारंभी १० हजार रूपयांचा निधी दिला. यातून शेतकऱ्यांनी काम सुरू केले. मात्र यानंतर निधी देताना कर्मचाऱ्यांनी आखडता हात घेतला. यामुळे अनेक विहिरीचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्यात धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत १४ हजार ८४५ विहिरी पूर्ण झाल्या. यातील सात हजार विहिरी पूर्ण झाल्या. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याने चार हजार १३२ विहिरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आले. यामधील केवळ ७२ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. दोन हजार २९२ विहिरी अपूर्ण आहेत. त्यासाठी ३६ कोटी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. मात्र ह्या विहिरींचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी अमरावती विभागीय आढावा बैठक यवतमाळात ३ मार्च रोजी घेतली. त्यावेळी अपूर्ण सिंचन विहिरींचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. त्यांनी हीबाब गार्भीयाने घेत रखडलेल्या विहिरी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला. त्यावरून जिल्हाधिकारी राहूलरंजन महिवाल यांनी या विहिरी पूर्ण करण्यासाठी कंबर कसली. त्यातून निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विहिरीचे पालकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. रखडलेल्या २२९२ विहिरींचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांसोबत स्थानिक यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालकत्व दिले आहे. दर आठ दिवसाला अधिकाऱ्यांना कामाचा आढावा घ्यावा लागणार आहे. प्रशासनातील अडथळे दूर करायचे आहेत. यामध्ये ३० जूनपूर्वी काम पूर्ण न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.