शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आता ११०० रुपयांचे सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 05:00 IST

गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे घरगुती गॅस सिलिंडर १ हजार ८६ रुपयांचा झाला आहे. परंतु, घरपोच डिलिव्हरी देताना ग्राहकांकडून थेट ११०० रुपये घेतले जात आहे. गावपातळीवर तर हा सिलिंडर १३०० रुपयांपर्यंत खरेदी करावा लागत आहे. यातूनच अनेकांनी संताप नोंदविला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी तूर्त गॅस बुकिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे घरगुती गॅस सिलिंडर १ हजार ८६ रुपयांचा झाला आहे. परंतु, घरपोच डिलिव्हरी देताना ग्राहकांकडून थेट ११०० रुपये घेतले जात आहे. गावपातळीवर तर हा सिलिंडर १३०० रुपयांपर्यंत खरेदी करावा लागत आहे. यातूनच अनेकांनी संताप नोंदविला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी तूर्त गॅस बुकिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सहा लाखांवर घरगुती गॅस सिलिंडरधारक आहे. यातील उज्ज्वला गॅस धारकांना सबसिडी मिळणार आहे. परंतु, प्रारंभी पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. मात्र, इतर सर्वसामान्य नागरिकांना पूर्ण रक्कम भरून केवळ १९ रुपये सबसिडी मिळणार आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक चिंतेत सापडलेले आहेत. राज्यात नव्याने सरकार आल्यानंतर महागाईवर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सिलिंडरच्या किमत ५० रुपयांनी वाढल्या आहेत. पूर्वी एक हजार ३६ रुपये दराने मिळणारे सिलिंडर आता वाढीव दरामुळे एक हजार ८६ रुपये ५० पैसे इतक्या दराचे झाले आहे. हे वाढलेले दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याचा फटका गॅस एजन्सीधारकांनाही बसला आहे. गत दोन महिन्यांपासून या ठिकाणी बुकिंगचे प्रमाण घटल्याचे सांगितले जात आहे. 

केरोसीन मिळेल काय; जनसामान्यांचा सवाल - यवतमाळ जिल्हा हा केरोसीनमुक्त जिल्हा झाला आहे. सिलिंडरच्या वाढलेल्या संख्येमुळे हा निर्णय जाहीर करण्यात आला. आता दर वाढल्याने पुन्हा केरोसीनवर स्वयंपाक करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. परंतु केरोसीन मिळेल का हा प्रश्न आहे.

व्यावसायिक सिलिंडरचे दर २१२६ रुपये- घरगुती गॅसच्या तुलनेत व्यावसायिक सिलिंडर दुप्पट आहे. २१२६ रुपये दराने हे सिलिंडर व्यावसायिकांना मिळत आहे. घरगुती गॅससोबत या सिलिंडरच्या किमती वाढल्या नाही. परंतु पूर्वीच याचे दर दुप्पट असल्याने व्यावसायिकांनाही हे सिलिंडर खरेदी करणे महाग पडत आहे. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर