शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘पीडब्ल्यूडी’ची ईगल कंस्ट्रक्शनला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

कंत्राटदाराने बहुतांश रोड दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्याने वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळी व सायंकाळी जनावरे या रोडवरून जातात. ते खड्ड्यात उतरत नाही. अशावेळी दोन वाहने पास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ खड्डे खोदले गेले, सुरक्षेच्या उपाययोजना केल्या गेल्या नाही.

ठळक मुद्दे१८६३ कोटींच्या रस्त्यांचे कंत्राट : संथ गती, पाच टक्केही काम नाही, केवळ रस्ते खोदले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हायब्रीड अ‍ॅन्यूईटी अंतर्गत १८६३ कोटी रुपयांच्या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कल्याण येथील ईगल कंस्ट्रक्शन कंपनीला सार्वजनिक बांधकाम खात्याने कामाच्या संथ गतीबाबत नोटीस बजावली आहे. बांधकाम सचिवांच्या आदेशावरून मुख्य अभियंत्यांनी या कामांची प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणीही केली.हायब्रीड अ‍ॅन्यूईटी अंतर्गत पाच प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. उल्हासनगरच्या ईगल इन्फ्रा इंडिया लि. या कंपनीला या कामांचा एक हजार ८६३ कोटींचा कंत्राट मिळाला आहे. यामध्ये हिंगोली-यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेंबाळपिंपरी-पुसद-गुंज-माहूर, दिग्रस-पुसद-दारव्हा-नेर, यवतमाळ-कोळंबी-घाटंजी, यवतमाळ-दारव्हा-कुपटा आणि कुपटा-मंगरूळपीर या पाच रस्त्यांचा समावेश आहे.या कामाच्या संथ गतीबाबत मुंबईत बांधकाम सचिवांपर्यंत तक्रारी गेल्या आहेत. मुळात ईगल कंस्ट्रक्शनने वर्क आॅर्डर आठ महिने विलंबाने घेतली आहे. २६ मार्च २०१९ पासून सुरू झालेले हे काम किमान २० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते पाच टक्केही झाले नसल्याचे सांगितले जाते. एकीकडे काम झालेले नसताना मोबीलायझेशन अ‍ॅडव्हान्स म्हणून कंत्राटदाराने १८५ कोटी रुपयांची उचलही केली आहे.कंत्राटदाराने बहुतांश रोड दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्याने वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळी व सायंकाळी जनावरे या रोडवरून जातात. ते खड्ड्यात उतरत नाही. अशावेळी दोन वाहने पास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ खड्डे खोदले गेले, सुरक्षेच्या उपाययोजना केल्या गेल्या नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना या रस्ते विकासाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. क्रेशर, रेडिमिक्स, काँक्रिट युनीट नसणे, मटेरिअल साईड नसणे, रॉ मटेरिअलची पर्यायी व्यवस्था नसणे, खोदकाम झाल्यानंतर भराव न टाकणे, कुठेही युनीट उभे नसणे आदी ओरड या कंत्राटदाराबाबत बांधकाम खात्यातून ऐकायला मिळते. रस्त्यांची पूर्णत: चाळणी झाली आहे. त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. त्यापोटी ३० कोटी रुपये दिले गेले आहे. मात्र त्यानंतरही रस्त्यावरील खड्डे कायम आहे. पर्यायाने या मार्गावरील वाहनांचा वेग मंदावला आहे. या कामावरील सुपरव्हीजनसाठी स्वतंत्र अभियंता दिसत नाही. कंत्राटदार बिग बजेट असल्याने बांधकाम खातेही त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. केवळ नोटीस बजावण्याची खानापूर्ती केली जात आहे. सदर कंत्राटदाराने २० टक्के काम केलेच नाही तर त्याला १८५ कोटी रुपये दिले कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मुख्य अभियंत्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणीकामाच्या या संथ गतीबाबत अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदाराला नोटीस बजावल्या आहे. यापूर्वी या कामाची अधीक्षक अभियंत्यांनी पाहणी केली होती. गती वाढविण्याबाबत कंत्राटदाराला सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही कामकाज न सुधारल्याने दोन दिवसांपूर्वी सचिवांच्या आदेशावरून अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांनी या कामांवर भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बांधकाम खात्याने आतापर्यंत कंत्राटदाराला तीन-चार नोटीस बजावल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग