नोटाबंदीने शेतकरी देशोधडीला
By Admin | Updated: February 12, 2017 00:22 IST2017-02-12T00:22:34+5:302017-02-12T00:22:34+5:30
भाजपा सरकार एक एक लोकविरोधी निर्णय घेत आहेत. या सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.

नोटाबंदीने शेतकरी देशोधडीला
धनंजय मुंडे : जवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार सभा
आर्णी : भाजपा सरकार एक एक लोकविरोधी निर्णय घेत आहेत. या सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्यानिमित्ताने त्यांना चुकीच्या कारभाराची जाणीव करून द्यायची असेल किंवा रोखायचे असेल तर आमचे हात मजबूत करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले. जवळा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होत.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, भाजपा सरकारच्या ‘अच्छे दिन’ची चेष्ठा आता गावागावात होत आहे. कालाधन वापसची घोषणा घोषणाच राहिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही. उलट कमी भावात शेतमाल विकावा लागला. यात त्यांचे मोठे हात आणि नुकसान झाले. या सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू असे सांगितले होते. परंतु अजूनही अंमलबजावणी केली नाही. आपण यावेळी सरकारविरोधी कौल द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रसंगी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया यांनीही विचार मांडले. जवळा गटाच्या उमेदवार डॉ. आरती फुपाटे आदींची यावेळी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गाय नेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण शेतकरी असल्याचे सांगतात. मात्र ते कोणत्याही अँगलने शेतकरी वाटत नाही. मी आजही गायीचे दूध काढू शकतो असे ते सांगतात. आता हे सिद्ध करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एक गाय घेऊन जातो अन् त्यांना दूध काढायला सांगतो. यासाठी त्यांना खाली बसता आले नाही तर मी गायीला टेबलवर चढवितो अन मुख्यमंत्र्यांना उभ्याने दूध काढायला लावतो. यानंतर यातील सत्य जनतेपुढे आणतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.