ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST2021-06-19T05:00:00+5:302021-06-19T05:00:13+5:30
पूर्वी हॅकरकडून २४ तासात पैसे परत मिळविता येत होते. आता हॅकरने आपली पद्धती बदलविली आहे. आपल्या खात्यातून जसे पैसे चोरीला गेले त्याच क्षणी सायबर सेलशी संपर्क केला पाहिजे. यामुळे पैसे परत मिळणे शक्य होते. ठगविणारे नागरिक वळते केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात, दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यात असे नऊ-दहा वेळेस करतात. या परिस्थितीत तात्काळ प्रकरण पुढे आले तर असे पैसे वळते करताना बँकांना नोटीस बजावून पैसे रोखता येतात.

ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब !
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पैसे काढण्यासाठी आणि पैसे वळते करण्यासाठी अलिकडच्या काळात ऑनलाईन पद्धतीचा वापर वाढला आहे. ही पद्धती चांगली असली तरी यामध्ये काही ठगगिरी करणारे नागरिकही शिरले आहे. ते ग्राहकांचा ओटीपी मिळवून असे पैसे लुटतात.
जिल्ह्यामध्ये २०१९ पासून २०२१ पर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहे. ज्यामध्ये पैसे ठगगिरी करणाऱ्या व्यक्तीने काढून घेतले. नंतर ते ई-वाॅलेटमध्ये वळते केले. याच क्षणी तक्रार आल्यानंतर अलिकडे ४५ हजार रुपयांची रक्कम आणि पाच हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देता आली. अनेकांना ही रक्कम वापस मिळाली. मात्र ज्यांनी उशीर केला त्यांना पैसे गमवावे लागले. ग्राहकांनी आपला फोन वापरताना कुठल्याही प्रलोभनात न पडता आपला ओटीपी किंवा बँकेचा अकाऊंट नंबर इतरांना वळता करू नये. आपला ओटीपी दुसऱ्यांना मिळाला तरच असे पैसे चोरीला जातात. यासाठी फसव्या जाहिरातीपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
पूर्वी हॅकरकडून २४ तासात पैसे परत मिळविता येत होते. आता हॅकरने आपली पद्धती बदलविली आहे.
आपल्या खात्यातून जसे पैसे चोरीला गेले त्याच क्षणी सायबर सेलशी संपर्क केला पाहिजे. यामुळे पैसे परत मिळणे शक्य होते.
ठगविणारे नागरिक वळते केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात, दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यात असे नऊ-दहा वेळेस करतात.
या परिस्थितीत तात्काळ प्रकरण पुढे आले तर असे पैसे वळते करताना बँकांना नोटीस बजावून पैसे रोखता येतात.
अनोळखी ॲप नकोच
- अनेकवेळा मोफत गाणे डाऊनलोड करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्याच्या अनेक जाहिरात स्मार्ट फोनवर क्षणात दिसतात. अशावेळी असे ॲप डाऊनलोड करताना आपण चारवेळेस विचार केला पाहिजे.
- वस्तू महागडी असतानाही काही कंपन्या फार स्वस्त दरात आपली वस्तू असल्याचा दावा करतात. अशावेळी ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे. प्रथम वस्तू आल्यानंतरच त्याचे पैसे अदा केले पाहिजे.
- ऑनलाईन व्यवहार करताना अनेकवेळा ग्राहकाचा संपूर्ण डाटा हॅकरकडून चोरला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रथम साईटची खात्री करावी.
सायबर सेल अधिकारी म्हणतात...
ग्राहकांनी स्मार्ट फोन वापरताना आपल्या सद्सद् विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. कुठलीही प्रलोभने दाखविल्या गेली तर प्रथम ती साईट खरी आहे का, याचा शोध घेतला पाहिजे. आपला ओटीपी दुसऱ्यांना शेअर करू नेये.
- अमोल पुरी
एपीआय, सायबर सेल