जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नऊ कोटी $$्निरूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
By Admin | Updated: September 27, 2016 03:17 IST2016-09-27T03:17:02+5:302016-09-27T03:17:02+5:30
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पर्र्र्यटनाला प्रचंड वाव आहे. यामुळेच आता राज्य शासनाने जिल्ह्याच्या

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नऊ कोटी $$्निरूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पर्र्र्यटनाला प्रचंड वाव आहे. यामुळेच आता राज्य शासनाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ९ कोटींची तरतुद करण्यात आली असून दुर्लक्षित स्थळे पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे.
जिल्ह्यात क वर्ग पर्र्र्र्यटनाची ३२ ठिकाणे आहेत. जिल्ह्यातील दोन पर्यटनस्थळे प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून विकसीत करण्यात येणार आहे. तर या सोबतच राज्य शासनाने जिल्ह्यात दोन स्थळांना वन पर्यटनाचा दर्जा दिला आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा निधी अपूरा आहे. क वर्ग पर्यटनासाठी जिल्हा नियोजन विकासातून १ कोटी रूपयांचा निधी आरक्षित करण्यात आला आहे. या माध्यमातून
३२ स्थळे विकसीत करण्यात येणार आहे. त्या आराखडा नियोजन विभागाने तयार केला आहे.
त्या दृष्टीने कामाला सूरूवात
झाली आहे.
प्रादेशिक पर्र्यटन विकास
निधीतून मोठा निधी
जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून फार तोकडा निधी पर्यटनासाठी उपलब्ध होतो. मात्र प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून मोठी तरतुद करता येते. जिल्ह्यातील दोन ठिकाणाच्या विकासासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प आणि कळंब तालुक्यातील दत्तापूर या ठिकाणाचा विकास करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्पाच्या पर्यटन विकासासाठी तीन कोटी ५६ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ८६ लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी वळता झाला आहे. यातून पर्यटन निवासस्थाने, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते, जमीन सपाटीकरण, परिसर सुशोभिकरण या प्रमुख बाबींचा समावेश आहे. कळंब तालुक्यातील दत्तापूर हे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणचा तलाव, हिरवळ पर्यटकांना आकर्षित करणारी आहे. या ठिकाणाच्या विकासासाठी पाच कोटी ६४ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. मंजूर निधीपैकी २ कोटी १६ लाख रूपयांचा निधी वळता करण्यात आला. १ कोटी ७६ लाख रूपयांच्या खर्चातून काही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे.
ही आहेत ३२ स्थळे
४जिल्ह्याच्या क वर्ग पर्र्र्यटन स्थळांच्या यादीत यादीत यवतमाळ तालुका ढुमणापूर, वसंतस्मृती उद्यान, जामवाडी, निळोना, उमर्डा नर्सरी, मनदेव देवस्थान, मनपूर, जेतवन पॅलेस, उमरखेड तालुका तपोवन, कवडशी, सहस्त्रकुंड, अंबोना तलाव. कळंब तालुका खटेश्वर संस्थान, निरंजन माहूर, दत्तापूर, मांजरा, आनंद दत्तब्रम्हगड, नागभूमी प्रज्ञा बुध्दविहार खटेश्वर. मारेगाव तालुका पांढरदेवी, नवरगांव, जुंजाई धबधबा, कोसारा. दारव्हा तालुका गोखी प्रकल्प, रंगो बापूजींचे समाधीस्थळ, कुंभारकिन्ही धरण. नेर तालुका पाथ्रट गोळे, सिरसगाव, चिंतामणी खोंड्या बारड टेकडी (शिरसगाव पांढरी), पुसद तालुका धुंदी, झरी तालुका मुळगव्हाण. राळेगाव तालुका वरध, पूरातन मालगुजरी तलाव. दिग्रस तालुका भवानीमाता टेकडी. बाभुळगाव तालुका पहूर, मादनी यांचा समावेश आहे.
राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठे नियोजन केले जात आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. चिंतामणी, सहस्त्रकुंड यासह अनेक ठिकाणाचा विकास झाल्याचे चित्र पहायला मिळेल.
- मदन येरावार,
राज्यमंत्री, पर्यटन विकास
वनपर्यटनाच्यादृष्टीने टिपेश्वर अभयारण्य सर्वात मोठे आहे. याठिकाणी वाघांची संख्या मोठी आहे. पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी पर्यटक इच्छुक आहेत. मात्र सोयीसुविधांचाच अभाव आहे. प्राथमिक सुविधा पुरविण्यासोबत रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- मिलींद धुर्वे,
सदस्य, जिल्हा परिषद