शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’त नवे गडी, नवे राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वाटणीला आले.

ठळक मुद्देकामकाजाकडे लक्ष : योजना तळागळापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी व नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमुळे ‘नवे गडी, नवे राज’ आले आहे. पदाधिकाऱ्यांना जेमतेम तीन महिनेच झाले. त्यातच आता नवीन सीईओ आल्याने जिल्हावासीयांच्या नजरा जिल्हा परिषदेकडे लागल्या आहे.तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वाटणीला आले. मात्र नवीन पदाधिकाऱ्यांनी कामकाजाची सुरुवात करताच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे लॉकडाऊन असल्याने जवळपास सर्वच कामकाज ठप्प पडल्यासारखे झाले. कर्मचाऱ्यांची उपस्थितीसुद्धा रोडावली. शासनानेच जवळपास तीन महिने कर्मचाºयांच्या उपस्थितीतवर निर्बंध घातले. त्यानुसार सुरुवातीला केवळ पाच टक्के कर्मचारी कार्यरत होते. या काळात अनेक पदाधिकाऱ्यांनी वास्तूत येण्याचेही टाळले.तीन महिन्यांचा अवधी लॉकडाऊनमध्ये गेल्याने नवीन पदाधिकाऱ्यांना अद्यापही मनमोकळेपणाने काम करता आले नाही. पदभार घेताच त्यांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ठ लागले. आता या नवीन पदाधिकाऱ्यांच्या साथीला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी लाभले आहे. डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सीईओपदाची सूत्रे हाती घेतली आहे. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात काही विभागांना शिस्त लागली. मात्र वास्तूत त्यांचा वचक दिसून आला नाही. आता नवीन सीईओ प्रशासकीय शिस्त लावून कर्मचाऱ्यांवर वचक ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन पदाधिकारी व नवीन सीईओ जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्याची अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजना तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना योजनाचा लाभ मिळावा याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.डॉक्टरांना नस सापडेल काय ?नवीन सीईओ स्वत: डॉक्टर आहे. यवतमाळ जिल्ह्याचा व्याप मोठा आहे. याची त्यांना जाणीवही आहे. पदभार ग्रहण करताच त्यांनी आरोग्यविषयक बाबींकडे लक्ष देणार असल्याचे निक्षून सांगितले. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याने आधी त्यांना सांगोपांग विचार करावा लागणार आहे. मात्र नवीन सीईओ यांना ग्रामीण भागाविषयी ओढ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खऱ्याअर्थाने शासनाच्या विविध योजना तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना प्रशासनाची नस सापडेल काय, असा प्रश्न आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद