नेरला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:29+5:30
पावसामुळे गहु पूर्णपणे झोपला आहे. हरभरा घरात आणण्यासाठी काढून ठेवलेला असताना पावसामुळे खराब झाला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पिकाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांमधून होत आहे.

नेरला पावसाने झोडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. अतिवृष्टी, कमी पाऊस आदी कारणांमुळे शेतीचे संपूर्ण तंत्र बिघडले आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मंगळवारी रात्री तालुक्यात झालेल्या पावसाने आणि गारपिटीने गहू व हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
पावसामुळे गहु पूर्णपणे झोपला आहे. हरभरा घरात आणण्यासाठी काढून ठेवलेला असताना पावसामुळे खराब झाला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पिकाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांमधून होत आहे.
खरिपात सोयाबीनने दगा दिल्यानंतर शेतकºयांची संपूर्ण मदार रबीतील पिकांवर होती. मात्र त्यावरही मंगळवारी झालेल्या पावसाने पाणी फेरले, शेतकºयांच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला. आता त्यांना सरकारकडून नुकसान भरपाईची आस लागली आहे. झालेल्या नुकसानीचा विनाविलंब पंचनामा करावा, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.