नेर, कळंब, बाभूळगाव, राळेगाव तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:16+5:30

परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मंजूर करावी, राज्यपालांनी मंजूर केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.

Ner, Kalamb, Babulgaon, Ralegaon tahsil hit | नेर, कळंब, बाभूळगाव, राळेगाव तहसीलवर धडक

नेर, कळंब, बाभूळगाव, राळेगाव तहसीलवर धडक

ठळक मुद्देशिवसेनेचे निवेदन : शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन शिवसेनेतर्फे सोमवारी येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मंजूर करावी, राज्यपालांनी मंजूर केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र राऊत, संचालक भाऊराव ढवळे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन भोकरे, युवा सेना तालुका प्रमुख सुजित कुंभारे आदी उपस्थित होते.

बाभूळगाव तहसीलदारांना निवेदन
बाभूळगाव : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न येथील तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून शिवसेनेने मांडले. पीक विमा, परतीच्या पावसाने झालेले नुकसान, वीज बिल माफी, रानडुकरांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वे व मदत मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या. नायब तहसीलदार वाय.के. निवल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष वसंत जाधव, संघटक विजय भेंडे, चंद्रशेखर केळतकर, विक्रम लाकडे, सुधीर कडुकार, विकास गर्जे, नवनीत कावलकर, प्रदीप राऊत, विजय दंडे, संजय ठाकरे, ए.एन. देशमुख, उमेश वर्मा आदी उपस्थित होते.

कळंब तहसीलवर धडक
कळंब : सरसकट नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिवसेनेतर्फे येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिगांबर मस्के, तालुका प्रमुख नीलेश मेत्रे, भारतीय विद्यार्थी सेना संघटक अभिषेक पांडे, आदिवासी आघाडी प्रमुख वसंतराव कंगाले, शहर प्रमुख रोशन गोरे, विभाग प्रमुख प्रेमेश कोरडे आदी यावेळी उपस्थित होते.

घरकूल बांधकामासाठी मोफत रेती हवी
राळेगाव : शिवसेनेतर्फे तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून घरकूल बांधकाम व वैयक्तिक लाभाच्या शौचालय बांधकामासाठी मोफत रेती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय शेतकºयांचे अनेक प्रश्न मांडण्यात आले. श्रावणबाळ लाभार्थ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ करून दरमहा पाच हजार रुपये द्यावे, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विधवांसाठीच्या सामाजिक सहाय्य अनुदानात वाढ करून ती दोन लाख रुपये करावी, बांधकाम पूर्ण झालेल्या तलाठी कार्यालयातून कामकाज सुरू करावे, वीटभट्टी कारखानदारांना शेती अकृषक करूनच परवाने द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख विनोद काकडे, प्रशांत वाऱ्हेकर, शंकर गायधने, वर्षा मोघे, विजय पाटील, गौरव जिड्डेवार, सुरेंद्र भटकर, हनुमान डाखोरे, इंदल राठोड, मंगेश राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Ner, Kalamb, Babulgaon, Ralegaon tahsil hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी