शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

Maharashtra Election 2019; राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 2:05 PM

विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सोमवारी केले.

ठळक मुद्देवणीत मनसे उमेदवारांसाठी प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: देशात, राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असून ती थांबविण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे मत व्यक्त करून हा विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सोमवारी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांसाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वषार्पूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आज संकटात आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही बाब अभिमानाची नसल्याचेही त्यांनी सांगितले. आजही शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतच असल्याचे ते म्हणाले. नोटबंदीमुळे देशात मंदी आली असून त्यामुळे विविध उद्योगातून कर्मचाºयांना काढून टाकले जात आहे. पुढे ३० टक्के सरकारी कर्मचाºयांनाही नोकरीवरून काढले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, ज्येष्ठ नेते विठ्ठल लोखंडकर, अनिल शिदोरे, मनसेचे वणी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजू उंबरकर, वरोरा-भद्रावती मतदार संघाचे उमेदवार रमेश राजूरकर, राजूरा मतदार संघाचे उमेदवार महालिंग कंठाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेyavatmal-acयवतमाळ