NCP's request for crop insurance at NER | नेर येथे पीक विम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
नेर येथे पीक विम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
सन २०१८-१९ या हंगामात पीक आणेवारी ५० टक्क्याच्या आत असल्यामुळे शासनाने नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. त्यावेळी तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. विमाधारक शेतकºयांना पीक विमा लागू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ठराविक शेतकºयांना विम्याचा लाभ मिळाला. तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिके आहेत. या पिकांचा मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात आला होता. शासनाने कोणत्या पिकाला किती विमा द्यावा, याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होऊनही विम्याची रक्कम शेतकºयांना मिळाली नाही. सर्व शेतकºयांना लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, नेर तालुका अध्यक्ष सुनील खाडे, नगरसेवक सुभाष भोयर, तन्वीर खाँ पठाण, अ‍ॅड. बाबा चौधरी, युवराज अर्मळ, नानासाहेब भोकरे, इरफान अकबानी, अमोल घरडे, पद्माकर राऊत, नीलेश देशमुख, बाळासाहेब गावंडे, संदीप चौधरी, अ‍ॅड. दिलीप देशमुख, प्रकाश घरडे, गजानन गोळे आदी उपस्थित होते.


Web Title: NCP's request for crop insurance at NER
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.