नवाकोरा पूल मुसळधार पावसात उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 20:50 IST2019-08-06T20:49:03+5:302019-08-06T20:50:18+5:30
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगाव येथील वर्षभरापूर्वीच झालेल्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. पुलावरील लोखंडी गजही उघडे पडल्याने ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.

नवाकोरा पूल मुसळधार पावसात उखडला
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगाव येथील वर्षभरापूर्वीच झालेल्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. पुलावरील लोखंडी गजही उघडे पडल्याने ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.
ढाणकी-गांजेगाव मार्गे मराठवाड्यातील हिमायतनगरला जोडण्यासाठी पैनगंगा नदीवर गांजेगाव येथे हा पूल बांधण्यात आला. दोन दिवस संततधार पाऊस पडल्याने या पुलावरून पाणी गेले. वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेला पुलावरील रस्ता पाण्यात वाहून गेला. येथे यापूर्वी सिमेंटचा रस्ता होता. ते सिमेंटही वाहून गेले. पुलावरील गज उघडे पडले असून नवे डांबरही वाहून गेले आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
या पुलाची दुरुस्ती त्वरित करणे गरजेचे आहे. पुलाव्यतिरिक्तही या रस्त्यावर सर्वत्र १५ किलोमीटरपर्यंत पावसामुळे खड्डे पडले आहे. उमरखेड आगारातून सुरू असलेल्या आठ बसफेऱ्याही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सध्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमरखेड एसटी आगाराला सर्वात जास्त उत्पन्न देणारा मार्ग बंद झाला आहे. उमरखेड तालुक्यातून तिरुपती, आंध्रप्रदेश, नांदेड, मुंबई रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांचे हाल होत आहे. तसेच मराठवाड्यातून व गांजेगाव येथून ढाणकीला शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने हा रस्ता त्वरित दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी आहे.