नटराजचे गायक राष्ट्रीय स्पर्धेत चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:38 IST2019-06-10T21:37:51+5:302019-06-10T21:38:02+5:30
पुणे येथे भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित राष्ट्रीय गायन स्पर्धेत येथील नटराज संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी अनेक पुरस्कारांची कमाई केली. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार घेत डिसेंबर २०१९ मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

नटराजचे गायक राष्ट्रीय स्पर्धेत चमकले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुणे येथे भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित राष्ट्रीय गायन स्पर्धेत येथील नटराज संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी अनेक पुरस्कारांची कमाई केली. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार घेत डिसेंबर २०१९ मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
राष्ट्रीय स्पर्धेत गायन, वादन, नृत्य प्रकारात सुमारे १२ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. गायन स्पर्धेत नटराजच्या चारही गायक कलावंतांनी पुरस्कार मिळविले. सिया हिंडोचा, साक्षी देशपांडे यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. प्रशिका डोंगरे हिला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. वीर केळकर यांनी चेअरमन पुरस्कार मिळविला. या कलावंतांना अकादमीच्या लीना गिरिश कळसपुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. नटराज संगीत कला अकादमीचे संगीतकार बाबा चौधरी व डॉ. किशोर सोनटक्के यांनी या कलावंतांचे कौतुक केले.