नाथनगरची निवासी शाळा झाली ‘आयएसओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:34 IST2017-09-24T00:34:05+5:302017-09-24T00:34:27+5:30
महाराष्टÑ शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत आर्णी तालुक्यातील नाथनगर (चिखली) येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

नाथनगरची निवासी शाळा झाली ‘आयएसओ’
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : महाराष्टÑ शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत आर्णी तालुक्यातील नाथनगर (चिखली) येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील आयएसओ होणारी ही पहिली शाळा होय.
सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यात ८४ निवासी शाळा सुरू आहेत. त्यात सर्वाधिक सात शाळा यवतमाळ जिल्ह्यात आहेत. नाथनगर चिखली येथील शाळेत सहावी ते दहावीपर्यंत सेमी इंग्रजी पॅर्टनवर आधारित शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा निवास व्यवस्था व सर्व भौतिक सुविधा पुरविल्या जातात. प्रशस्त इमारत, शाळाबाह्य उपक्रम राबविले जातात. सहाय्यक आयुक्त मिलिंद शंभरकर यांच्या निर्देशानुसार व सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, पियूष चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही शाळा आयएसओ ठरली. यासाठी मुख्याध्यापक बी.जे. मडावी, सी.डी. खोडे, आर.पी. तायडे, पी.व्ही. अलोणे, पी.ए. भेंडे, एम.एम. पवार, डी.के. नागपुळे, ए.आर. सोळंके, एस.वाय. महल्ले, व्ही.एस. सोनुले, जी. शिरभाते, पी.पी. ठाकरे, एस. वानखडे यांनी परिश्रम घेतले.