दहेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:19+5:30

सदर आरोग्य केंद्राला परिसरातील अनेक गावे जोडण्यात आली आहे. दररोज १०० ते १५० रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु डॉक्टर उपलब्ध राहात नसल्याने त्यांना परिचारिका औषधोपचार करतात. थातूरमातूर उपचार घेवून नागरिकांना घरी परतावे लागते. यापरिसरात साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरीही दहेगाव आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना याविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते.

Named Primary Health Center of Dahegaon | दहेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी

दहेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी

ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय : अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी, बाहेरगावहून बजावतात ड्युटी

लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : राळेगाव तालुक्याच्या दहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी ठरले आहे. नागरिकांना अनेकदा उपचाराअभावी घरी परतावे लागते. शिवाय योग्य सेवाही मिळत नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी आहे.
सदर आरोग्य केंद्राला परिसरातील अनेक गावे जोडण्यात आली आहे. दररोज १०० ते १५० रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु डॉक्टर उपलब्ध राहात नसल्याने त्यांना परिचारिका औषधोपचार करतात. थातूरमातूर उपचार घेवून नागरिकांना घरी परतावे लागते. यापरिसरात साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरीही दहेगाव आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना याविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते.
मुख्यालयी राहात नसलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आता दिवाळी सुट्यांचे निमित्त सापडले आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु वरिष्ठांचा वचक नसल्यामुळे स्थानिक रुग्णांना उपचार मिळत नाही. नाईलाजाने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागते. याप्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य प्रीती काकडे यांना विचारले असता, अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा देणे आवश्यक आहे. दहेगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर मुख्यालयी राहात नसल्यास चौकशी केली जाईल, असे त्या म्हणाले.

दिवाळीची सुटी असल्याने बाहेर आहे. नेहमी मुख्यालयी राहतो. अधिक माहितीसाठी प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकतात.
- सूरज पडगलवार, वैद्यकीय अधिकारी, पीएचसी दहेगाव.

Web Title: Named Primary Health Center of Dahegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य