बोंडअळीवर नेर तालुका काँग्रेसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:29 IST2017-12-02T23:28:42+5:302017-12-02T23:29:20+5:30
गुलाबी बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अशी मागणी तालुका काँग्रेसने शनिवारी नेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बोंडअळीवर नेर तालुका काँग्रेसचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : गुलाबी बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अशी मागणी तालुका काँग्रेसने शनिवारी नेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकºयांनी जमिनी नांगरून टाकल्या असे तालुक्याचे चित्र आहे. यातच जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे अर्ज करताना अडचण निर्माण होत आहे. अनेक शेतकरी नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहात आहे. यामुळे ही अट शिथील करण्याची मागणी करण्यात आली.
सोयाबीन व कपाशीचे पीक घेतलेल्या प्रत्येक शेतकºयाला एकरी एक हजार रुपये बोनस द्यावा, गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, वीज बील माफ करावे, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विनायक भेंडे, अनिल पाटील जवळगावकर, बाशिद खान, सदाशिव गावंडे, पंजाबराव खोडके, रत्नाताई मिसळे आदी उपस्थित होते.