शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरात नाईकांना विक्रमी आघाडी

By admin | Updated: October 20, 2014 23:19 IST

नाईक घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या पुसद मतदारसंघावर नाईकांचे एकछत्री राज्य असले तरी शहरातील मतदारांनी मात्र नाईकांना भरघोस मते दिली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या

अखिलेश अग्रवाल - पुसदनाईक घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या पुसद मतदारसंघावर नाईकांचे एकछत्री राज्य असले तरी शहरातील मतदारांनी मात्र नाईकांना भरघोस मते दिली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुसद शहरानेही मनोहरराव नाईकांना विक्रमी आघाडी दिली. तब्बल पाच हजार ७१५ मतांची आघाडी या शहरात मिळाली. १९५२ मध्ये पुसद मतदारसंघ अस्तित्वात आला. २६ वर्ष वसंतराव नाईक, १९ वर्ष सुधाकरराव नाईक यांनी प्रतिनिधीत्व केले. १९९५ पासून मनोहरराव नाईक प्रतिनिधी करीत आहे. एकंदरितच ६२ वर्षांपासून नाईक घराण्याचा दबदबा या मतदारसंघावर कायम आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पुसद शहरात मात्र नाईक घराण्याला कधी आघाडी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी यांना पुसद शहरात पाच हजाराची आघाडी होती. पुसद शहराने नेहमीच विरोधकांच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र विधान सभेच्या निवडणुकीत पाच हजार ७१५ अशी आघाडी नाईकांना मिळाली. पुसद विधानसभा मतदारसंघात मनोहरराव नाईक यांना ९४ हजार १५२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रकाश देवसरकर यांना २८ हजार ७९३ मते मिळाली. संपूर्ण मतदारसंघात ६५ हजार ३५९ मतांची आघाडी मिळाली आहे. अशीच आघाडी पुसद शहरातही मनोहरराव नाईक यांना मिळाली आहे. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक या दिग्गजांनी ४५ वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. पण त्यांना पुसद शहरात आघाडी मिळाली नाही. ती यंदा मनोहरराव नाईकांनी शहरात विक्रमी आघाडी घेतली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक पुसद शहरातील ४८ मतदान केंद्रापैकी १३ केंद्रावर मागे आहे. तर सेनेचे प्रकाश पाटील चार ठिकाणी व भाजपाचे वसंतराव पाटील कान्हेकर नऊ ठिकाणी आघाडीवर आहे. काँग्रेसचे अ‍ॅड. सचिन नाईक यांना शहरातील वसंतनगर, गढीवार्ड या भागात आघाडी मिळाली नाही. या दोनही ठिकाणी राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक यांना मते दिली. ६२ वर्षात पुसद शहरात प्रथमच आघाडी मिळविण्यामागे शहरी मतदारांचा विश्वास संपादन करण्यात नाईकांना यश आल्याचे दिसत आहे. माजी नगराध्यक्ष सतीश बयास, माजी उपाध्यक्ष डॉ. अकील मेमन, पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, इंद्रनिल नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, के.डी. जाधव, जयवंतराव पाटील, पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांच्यासह इतर नेते, पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून प्रचारात समन्वय व एकत्रीकरणातून पुसद शहरात मनोहरराव नाईकांना विक्रमी आघाडी मिळवून दिली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.