नगरपालिका निवडणूक: आमदार बच्चू कडूंच्या प्रहार युवा शक्तीने काँग्रेस, भाजपाचा केला दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:11 IST2017-12-14T13:07:43+5:302017-12-14T13:11:28+5:30
पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेने भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेला जोरदार धक्का दिला.

नगरपालिका निवडणूक: आमदार बच्चू कडूंच्या प्रहार युवा शक्तीने काँग्रेस, भाजपाचा केला दारुण पराभव
यवतमाळ - पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेने भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेला जोरदार धक्का दिला. पांढरकवडात नगरपालिकेत १९ पैकी १४ जागांवर अपक्ष आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेचे उमेदवार विजयी झाले.
भाजपाला तीन, तर काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी प्रहारच्या वैशाली नहाते १२७० मतांनी विजयी झाल्या. विदर्भात अमरावती जिल्ह्याबाहेर पहिल्यांदाच प्रहारचा नगराध्यक्ष व पालिकेत सत्ता आली.