नाफेडची तूर खरेदी मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:34 IST2017-08-12T02:34:19+5:302017-08-12T02:34:45+5:30
बाजार समितीत नाफेडची तूर खरेदी मंदावल्याने शेतकरी चितांतूर झाला आहे. तूर खरेदीची शेवटची डेडलाईन ३१ आॅगस्ट असून अजूनही दोन हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी व्हायची आहे.

नाफेडची तूर खरेदी मंदावली
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : बाजार समितीत नाफेडची तूर खरेदी मंदावल्याने शेतकरी चितांतूर झाला आहे. तूर खरेदीची शेवटची डेडलाईन ३१ आॅगस्ट असून अजूनही दोन हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी व्हायची आहे. यातच बाजार समितिने घेतलेली तूर तशीच असल्याने जागा नसल्याच्या कारणावरून तुरीची खरेदी मंदावली आहे
यावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देवून तूर लागवड केली खरी. पन सरकारने तूर मोठ्या प्रमाणात आयात करून तुरीचे भाव पाडले. शेतकºयांच्या रोषामुळे नाफेडची खरेदी चालू केली मात्र रडतपडत तिन चार वेळा बंद चालू करीत खरेदी केली.
आता चौथ्यांदा महाराष्ट्र शासनाने चालू केली. एकूण तीन हजार दोनशे शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केलेली होती. त्यापैकी बाराशे शेतकºयांची तूर खरेदी झाली असून जवळपास दोन हजार शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे आणि तूर खरेदीची डेडलाईन ३१ आॅगस्ट आहे. सध्याचा तूर खरेदी करण्याचा वेग पाहता ठराविक कालावधीत हे काम होईल, असे वाटत नाही.
परंतु बाजार समितीच्या आवारातील खरेदी केलेला माल न उचलल्यामुळे तूर खरेदी मंदावली असून खरेदी बंद होण्याची तारीख जवळ येत आहे. पुन्हा मुदतवाढ मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकºयांच्या काळजीत वाढ झाली आहे. एकीकडे पाऊस नाही आणि मागील हंगामातील तूर घरात पडून आहे, सावकारी कर्ज काढून शेती केली आणि आता जर तूर खरेदी बंद झाली तर पुन्हा आर्थिक विवंचना येवून आत्महत्यात वाढ होइल. ही वेळ येवू नये यासाठी सबंधित यंत्रणेने त्वरित पाउले उचलावीत व तूर खरेदीचा वेग वाढवावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
तूर खरेदीचा वेग असाच राहिला आणि खरेदी अशीच मंदावली तर ३१ आॅगस्टपर्यत तूर खरेदी होणार नाही. परिणामी पुन्हा तूर खरेदीच्या शासनाच्या परवानगीची वाट बघावी लागेल.
- गोपाळ चव्हान, युवा शेतकरी स्ांघर्ष वाहिनी नेर