मुस्लीम समाज बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:02 IST2017-09-08T22:01:57+5:302017-09-08T22:02:17+5:30
म्यानमारमध्ये मुस्लीम बांधवांची सामूहिक हत्या केली जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लिम समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांनी रोष व्यक्त जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले.

मुस्लीम समाज बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : म्यानमारमध्ये मुस्लीम बांधवांची सामूहिक हत्या केली जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लिम समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांनी रोष व्यक्त जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले.
म्यानमारमध्ये मुस्लीम बांधवांचा प्रशासनाकडून छळ सुरू आहे. वारंवार हल्ले करून मुस्लिम नागरिकांची सामूहिक हत्या केली जात आहे. या कृत्याचा निषेध नोंदविण्यासाठी स्थानिक कळंब चौकातून समाज बांधवांनी रॅली काढली. मानव जातीला लाजविणाºया या सामूहिक मानवहत्येची दखल घेत क्षभार सरकारने उचित पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली. तसे निवेदन म्यानमारच्या राजदूतांकडे पाठविविले.
तिरंगा चौकात समाज बांधवांनी निषेध नोंदविला. निषेध फलक उंचावून तेथील जिवंत चित्रांचे वास्तव मांडले. या आंदोलनाचे नेतृत्व शाज अहेमद, यो. आसिम, शब्बीर खान, तारीक लोखंडवाला, आसिम अली, मन्सून एजाज जोश, नजीर अहेमद, सय्यद नूर, अखतर साहिद, फसीउल्ला खान, गुड्डू शाहीद, नवाब उद्दीन, इम्रान अली, शाज अहेमद आदींनी केले.