शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

लोहारात भरदिवसा युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

बुधवारी दुपारी देवीदास दुचाकीने जात असताना वाहनाची धडक देऊन त्याला पाडण्यात आले. नंतर त्याचा गळा चिरण्यात आला. हा घटनाक्रम अगदी काही मिनिटात घडला. त्यामुळे नेमके काय झाले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. सुरुवातीला अपघात झाला असावा म्हणून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र गळ्यातून प्रचंड रक्तस्राव होवून देवीदासचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देपूर्ववैमनस्य : महिनाभरापूर्वीच आला होता कारागृहाबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील लोहारा येथे बुधवारी दुपारी १.३० वाजता भररस्त्यात युवकाचा गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेने शहरातील गँगवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.देवीदास निरंजन चव्हाण (२५) रा.उद्योगनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. देवीदासवर भैया यादव याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तो मागील दीड वर्षांपासून कारागृहात होता. महिनाभरापूर्वी त्याची सुटका झाली. या काळात देवीदासचा भाऊ दुर्गेश याने प्रतिस्पर्धी टोळीतील एकाचा देवीनगर प्रवेशद्वाराजवळ खून केला. या गुन्ह्यात तो कारागृहात आहे. देवीदास काही दिवसांपासून एकटाच लोहारा परिसरात राहात होता. विरोधी टोळीच्या सदस्यांवर देवीदासच्या खुनाचा संशय आहे.बुधवारी दुपारी देवीदास दुचाकीने जात असताना वाहनाची धडक देऊन त्याला पाडण्यात आले. नंतर त्याचा गळा चिरण्यात आला. हा घटनाक्रम अगदी काही मिनिटात घडला. त्यामुळे नेमके काय झाले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. सुरुवातीला अपघात झाला असावा म्हणून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र गळ्यातून प्रचंड रक्तस्राव होवून देवीदासचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोहारा ठाणेदार सचिन लुले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण घटनास्थळी पोहोचले. याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. देवीदासचे मारेकरी नेमके कोण ? याचा शोध घेतला जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चव्हाण बंधूपैकी एकाची जीवनयात्रा रस्त्यावरच संपली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी देवीदास चव्हाण याने भैया यादव याच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळी टोळी विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे भैया यादवचा प्राण वाचला. त्याच ठिकाणी देवीदासचा खून केला गेला.वर्चस्वाच्या लढाईतून लोहारा परिसरात खुनाचे सत्रयवतमाळ शहरातील खुनाचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. टोळ्यांमध्ये एकमेकांचा वचपा काढण्यासाठी स्पर्धा लागली आहे. पूर्वी पाटीपुरा, आंबेडकरनगर परिसरात अशा पद्धतीने खुनाचे सत्र सुरू होते. आता गेल्या काही दिवसांपासून लोहारा भागात गुन्हेगार एकमेकाला संपविण्यासाठी झगडत आहेत. भरदिवसा भर रस्त्यात झालेल्या खुनाने लोहारा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

टॅग्स :Murderखून